Mumbai Pune Expressway : Good News; सहापदरी एक्स्प्रेस-वे होणार आठपदरी! काय आहे प्लॅन?

Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswayTendernama
Published on

पुणे (Pune) : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग (Mumbai Pune Expressway) आठपदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी शंभर हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तयार केला असून, लवकरच तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

Mumbai Pune Expressway
Mumbai : अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट बरोबर राज्य सरकारने का केले करार?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात. सध्य द्रुतगती महामार्ग हा सहापदरी आहे. महामार्गावरील वाहनांची दिवसेंदिवस वाढती वर्दळ लक्षात घेऊन सध्या हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’ने तयार केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा सुमारे ९४ किलोमीटर लांबीचा आहे.

या महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ‘एमएसआरडीसी’कडून सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत दोन बोगदे असून या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर आशिया खंडातील सर्वांत उंच दरी पुलाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.

Mumbai Pune Expressway
Nashik : आदिवासी घटक योजना आराखड्यालाही 20 कोटींची कात्री; 293 कोटींचा...

या प्रकल्पांतर्गत खालापूर टोलनाका ते खोपोली एक्‍झिटपर्यंत आठपदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील उर्से टोलनाक्यापासून द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला आहे. हे अंतर जवळपास ७० किलोमीटर आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्ग सलग आठपदरी होऊन विना अडथळा प्रवास वेगाने होणार आहे. तर सध्या या मार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्याही सुटण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाचा प्रकल्प

मुंबई येथील अटल सेतूचे उद्‍घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुढील टप्प्यात हा रस्ता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास येऊन मिळणार आहे. त्यादृष्टीने देखील या रस्त्याचे रुंदीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.

Mumbai Pune Expressway
CIDCO : सिडकोचा डबलधमाका; 3322 सदनिकांच्या सोडतीची घोषणा; किंमतही 6 लाखांनी कमी

द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच तो प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठविला आहे. या रस्त्याच्या बोगदे आणि सेवा रस्त्यासाठी सुमारे १०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.

- राकेश सोनावणे, कार्यकारी अभियंता ‘एमएसआरडीसी’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com