कात्रज चौकातील भूसंपादनाचा प्रश्न 15 दिवसांत मार्गी लावा; आयुक्तांसोबत...

Katraj Chowk Flyover
Katraj Chowk FlyoverTendernama
Published on

पुणे (Pune) : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर कात्रज चौकात पाहणी केली. उड्डाणपूल तसेच इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला. उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तांबरोबरील बैठकीत अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी दिली.

Katraj Chowk Flyover
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मार्गावरील 'त्या' महत्त्वाकांक्षी पुलाचे मिशन सक्सेस

कामाला गती द्यावी, सातारा रस्त्यावरील भाजी मंडई ते गुजरवाडी फाटा मार्गाचे नऊ मीटर रुंदीकरण व दफनभूमी रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया राबवून हे काम सुरू करावे, जेएसपीएम कॉर्नर येथील अतिक्रमण काढून कलव्हर्टचे काम सुरू करावे, चौकातील अतिक्रमण कारवाई झालेल्या भाजी मंडईसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, दत्तनगरकडे जाणारा रस्ता रुंदीकरण करून बस स्टॉपचे सुशोभीकरण करावे अशा सूचनाही त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. या कामांसाठी निधी उपलब्ध असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Katraj Chowk Flyover
Pune : PMPMLकडून अखेर डबलडेकर बसला मुहूर्त; टेंडर प्रक्रियेला सुरवात

या वेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, माजी नगरसेवक किशोर धनकवडे, कात्रज विकास आघाडीचे प्रमुख नमेश बाबर, दीपक गुजर, संभाजी थोरवे, अनिल कोंढरे आदींसह पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, विकास पाटील, कनिष्ठ अभियंता सलीम शेख, वाहतूक पोलिस निरीक्षक अजय संकेश्वरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com