वीजमीटरचा तुटवडा संपणार; महावितरणकडून तब्बल एवढ्या मीटरसाठी टेंडर

Mahavitran
MahavitranTendernama
Published on

पुणे (Pune) : नवीन वीजमीटरचा कोणताही तुटवडा नाही व पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. सप्टेंबरपर्यंत १५ लाख नवीन सिंगल फेज वीजमीटरच्या पुरवठ्याचे आदेश दिले आहेत. एप्रिलअखेर एक लाख ३१ हजार ८०२ वीजमीटर, तर मे महिन्यापासून आतापर्यंत आणखी दोन लाख ५० हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. याचबरोबर ७५ हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठा सुरु झाला आहे.

Mahavitran
Good News मुंबई-पुणे-हैदराबाद अवघ्या साडेतीन तासांत! वाचा सविस्तार

नवीन वीजजोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध आहेत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांकडून मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणचे संबंधित कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. सोबतच पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याने वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

Mahavitran
औरंगाबादेत मर्जितल्या ठेकेदारासाठी 'टेंडर पे टेंडर'चा खेळ!

कोरोना संसर्ग काळामध्ये विविध कंपन्यांकडून वीजमीटरचे उत्पादन थंडावले होते. यावर्षीच्या सुरवातीपासून मीटर उत्पादनाला नियमित सुरवात झाली आहे. टेंडर काढून पुरवठादारांना १५ लाख नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचा आदेश दिला आहे. त्यातून एप्रिलपासून आतापर्यंत दोन लाख ५० हजारांवर मीटर उपलब्ध झाले आहेत. याशिवाय जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी तीन लाख २५ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. तर ७५ हजार नवीन थ्रीफेजच्या मीटरचा पुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून सिंगल फेजच्या १२ लाख ८० हजार नवीन स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. मीटरची वाढती मागणी पाहता आणखी २० लाख सिंगल फेज मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तब्बल ३२ लाख ८० हजार नवीन वीजमीटर लवकरच टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत, असे महावितरणने कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com