Pune : 'निमगाव खंडोबा' परिसरात रोप-वे, पर्यटन सुविधांचा मार्ग मोकळा; 24 एकर जमीन हस्तांतरित

Rope Way
Rope WayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा देवस्थान परिसराचा रोप-वे व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यात येणार असून तेथील आध्यात्मिक, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यासाठी परिसरातली सुमारे शंभर कोटी रुपये किंमतीची 24 एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला.

Rope Way
होऊ दे खर्च!; महायुती सरकारची जाहिरातबाजीवर कोटीच्या कोट्टी उड्डाणे

राज्यातील आणि राज्याबाहेर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निमगाव खंडोबा देवस्थानाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार मौजे निमगाव येथील गट क्रमांक 135 मधील 14 हे. 40 आर. गायरान आणि शासकीय जमीन रोपवे व सार्वजनिक सुविधांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे मोफत वर्ग करण्यात आली आहे.

Rope Way
Mumbai : मुंबई महानगरातील 'त्या' प्रकल्पांना 'पीएफसी'ची पॉवर; 31 हजार कोटींचे पाठबळ

जमिनीचा ताबा घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर सुरु करणे तसेच या भागात वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. निमगाव खंडोबा देवस्थान प्राचीन, ऐतिहासिक महत्वाचे आध्यात्मिक स्थान असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आणि प्रयत्नशील होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मौजे निमगाव येथील 24 एकर शासकीय गायरान जमीन निमगाव खंडोबा मंदीर देवस्थान परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com