Pune : सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासाच्या चर्चा केवळ कागदावरच

Sarasbaug
SarasbaugTendernama
Published on

पुणे (Pune) : राज्य सरकारकडून ‘क्‍लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा मिळालेल्या सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासाला (फुडकोर्ड एरिया) काही मुहूर्त लागत नसल्याची चिन्हे आहेत. पूर्वीच्या आराखड्यानंतर नवीन आराखड्यास तत्त्वतः मंजुरीही मिळाली आहे. त्याला आठ महिने उलटले आहेत, मात्र अजूनही चौपाटीच्या पुनर्विकासाच्या चर्चा केवळ कागदांवरच होत आहे.

Sarasbaug
Hinjewadi IT Park : किवळे-वाकड-बालेवाडी 8 किमी एलिव्हेटेड मार्गाला मंजुरी; पण कामाला मुहूर्त कधी?

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सारसबाग हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. ‘तळ्यातील गणपती’चे दर्शन घेतल्यानंतर जवळच्याच सारसबाग चौपाटीवरील खाद्यपदार्थांवर खवय्यांची झुंबड उडते. प्रवासी, विद्यार्थी, रात्री उशिरा कामावरून परतणारे नोकरदार यांच्यासाठी रात्रीच्या जेवणासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणूनही सारसबाग चौपाटी ओळखली जाते. २०१९मध्ये राज्य सरकारने सारसबाग चौपाटीला ‘क्‍लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा दिला. दरम्यान, सारसबाग चौपाटीवरील अतिक्रमणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तेथे कारवाई करून काही गाळे सील केले होते. त्यावेळी सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला.

Sarasbaug
Pune : पुणेकरांचा प्रवास का झालाय आणखी खडतर? 'ती' सुविधा देण्याचा पीएमपीलाच पडला विसर

दरम्यान, महापालिकेने सारसबाग चौपाटीचा पुनर्विकास करण्याच्यादृष्टीने वास्तूविशारदांकडून आराखडे मागविले होते. त्यातील एका आराखड्याला मान्यताही देण्यात आली होती. त्यानंतर अचानक संबंधित आराखड्याचे काम थांबवण्यात आले. त्यानंतर पूर्वीच्या आराखड्यात बदल करून डिसेंबर २०२३मध्ये नवीन आराखडा महापालिकेच्या अंदाज समितीने (इस्टिमेट कमिटी) मंजूर केला होता. पुनर्विकास झाल्यानंतर सारसबाग चौपाटीचा रस्ता रस्ता बंद केला जाणार आहे. त्यासाठीही विकास आराखड्यात आवश्‍यक बदल केले जाणार आहेत. आता महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर पुढील आठवड्यात या प्रकल्पाच्या माहितीचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर सारसबागेच्या पुनर्विकासाचे काम सुरू होण्याची शक्‍यता आहे.

आठ कोटींचे झाले १८ कोटी

चौपाटीच्या पुनर्विकासासाठी प्रारंभी आठ कोटी रुपये खर्च येणार होता. यात वाढ होऊन आता हा खर्च १८ कोटी ५० लाख रुपयांवर पोचला आहे. मात्र, अजूनही चौपाटी पुनर्विकासाच्या कामाला सुरवात झालेली नाही.

सारसबाग चौपाटी पुनर्विकासाबाबत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यापुढे सादरीकरण होणार आहे. पुढील आठवड्यात हे सादरीकरण होईल. त्यानंतर पुनर्विकासाच्या कामाला सुरवात होईल.

- माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख, महापालिका

सारसबाग ‘फुडकोर्ट एरिया’ची वैशिष्ट्ये

- सारसबाग पुनर्विकासात दोन मजल्यांवर ७८ गाळे काढले जाणार

- तळमजल्यावर ५४, तर पहिल्या मजल्यावर २४ गाळे

- ५४ अधिकृत व्यावसायिकांच्या पुनर्वसनानंतर उर्वरित गाळ्यांचा होणार लिलाव

- आकर्षक रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, ग्राहकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था

- २०० वाहनांसाठी भूमीगत पार्किंग व्यवस्था

- भूमिगत पार्किंगसाठी दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com