Kothrud : विभागीय सहनिबंधकांचा दणका; 'त्या' फेडरेशनची नोंदणी अखेर रद्द

Kothrud
KothrudTendernama
Published on

पुणे (Pune) : कोथरूड (Kothrud) येथील सुमारे १४ एकर जागेचे एकत्रित मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी इंदिरा शंकर नगरी सहकारी गृहरचना संस्था संघाने (फेडरेशन) केलेला अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी अमान्य केला आहे. फेडरेशनची नोंदणी रद्द झाल्यामुळे आणि मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी केलेले कोणतेही कारण राहिले नाही, असे कारण जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे.

Kothrud
Atal Setu : अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आली गुड न्यूज! एमएमआरडीएने काढले ते महत्त्वाचे टेंडर

इंदिरा शंकर नगरी हा सुमारे १४ एकरच्या परिसरात असलेल्या सोसायट्यांचा विषय आहे. या सोसायट्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता आणि त्यांची मान्यता न घेता इंदिरा शंकर नगरी सहकारी गृहरचना संस्थांचा संघ (फेडरेशन) मर्यादित स्थापन करण्यात आला होता.

या फेडरेशनच्या नावाने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण परिसराच्या पुनर्विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून टेंडर मागविण्यात आले होते. तसेच फेडरेशनच्या नावाने संपूर्ण परिसराचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करण्यात आला. उपनिबंधकांकडून सोसायट्यांना नोटिसा आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Kothrud
Sinhagad Road : उड्डाणपूल झाला तरी राजाराम पूल चौकात का होतेय वाहतूक कोंडी?

त्यामुळे वीस ते बावीसहून अधिक सोसायट्यांनी विरोध केल्यामुळे कोथरूड परिसरात हा चर्चेचा विषय झाला होता, तर फेडरेशनने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मानीव अभिहस्तांतरणासाठी केलेल्या अर्जाच्या विरोधात या सोसायट्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर उपनिबंधकांपुढे सुनावणी सुरू होती.

Kothrud
MSRTC : एसटी महामंडळ होणार मालामाल! 'त्या' निर्णयाला सरकारचा हिरवा कंदील

सोसायट्यांच्या विरोधाची दखल

सोसायट्यांकडून होत असलेल्या या विरोधाची दखल घेत फेडरेशनने स्वत:हून या संपूर्ण परिसराच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी केलेला अर्ज मागे घेत असल्याचे पत्र मागील महिन्यात जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना दिले आहे. एकीकडे या अर्जावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे फेडरेशनची नोंदणी विभागीय सहनिबंधकांनी रद्द केली.

फेडरेशनची नोंदणी रद्द झाल्यामुळे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी केलेला अर्ज निष्फळ ठरल्यामुळे तो जिल्हा उपनिबंधकांनी रद्द केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com