इंद्रायणी, पवना, मुळेला जलपर्णीचा विळखा कायम; कोट्यवधी पाण्यात

Jalparni
JalparniTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील इंद्रायणी, पवना, मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधींची बिले दिली आहेत. मात्र, प्रत्यक्षात जलपर्णीचा विळखा शहरातील नद्यांना पडलेला दिसतो. नदीपात्रातील जलपर्णी अजून निघाली नसल्याने संबंधित कामाची पाहणी व चौकशी करण्याची मागणी सामाजिक संघटना करू लागल्या आहेत. जलपर्णी न काढता पैसे घेणाऱ्या ठेकेदारांवर (Contractor) कारवाई होणार का, असे प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

Jalparni
गडकरीजी, कधी होणार 'या' राष्ट्रीय महामार्गाचे काम?; नागरिकांचा जीव

जानेवारी ते मार्च दरम्यान टेंडर प्रक्रिया राबवण्यात येते. आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आले होते. पावसाळ्याच्या आधी हे काम होणे आवश्यक आहे. पण ठेकेदार पावसाची वाट पाहण्यात मग्न असल्याचे पहायला मिळत आहे. कारण पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की जलपर्णी काढावी लागत नाही तर ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाते. त्यामुळे काम करण्याची गरज पडत नाही. नेहमीचा कित्ता यावर्षी ही ठेकेदारांच्या वतीने राबविण्यात आला.

Jalparni
सरकार झाले 'ट्रिपल इंजिन' अन् आमदार मजेत पण ठेकेदार बुडाले कर्जात

साद सोशल फाउंडेशनचे संघटक राहुल कोल्हटकर म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा खेळ यावर्षी प्रशासकाच्या राज्यात दिसणार नाही, अशी आशा होती. पण नदी पात्रातील दृश्याने ती मावळली आहे.

Jalparni
Nagpur: नागपुरातील 'तो' प्रसिद्ध उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त ठरला?

सगळी जलपर्णी काढलेली आहे. कामाची मुदत ३० जूनपर्यंत होती. ४ कर्मचारी आणि जेसीबीच्या मदतीने नदीपात्रातील नद्यांतील जलपर्णी काढलेली आहे.
- यशवंत डांगे, सहायक आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com