कात्रज बोगदा-नवले पूल प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाची बातमी

Navale Bridge
Navale BridgeTendernama
Published on

पुणे (Pune) : कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान (New Katraj Tunnel To Navale Bridge) होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आता अवजड वाहनांसाठी ४० किलोमीटर प्रतितास (Speed Limit 40 KM/Hr) वेगमर्यादा राहणार आहे. याबाबतचा अंतिम आदेश शहर वाहतूक शाखेकडून काढण्यात आला आहे.

Navale Bridge
दशकांची कोंडी फुटणार; शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी पाडापाडी सुरू

मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार अपघात होत आहेत. राज्य सरकारच्या गृह विभागाच्या २७ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या. त्याचा विचार करून शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी हा आदेश काढला आहे.

Navale Bridge
UAE सरकारचा नाशिक विमानतळाबाबत महत्त्वाचा निर्णय; आता...

टॅक्टर-ट्रेलर, ट्रक-ट्रेलर, आर्टिक्युलिटेड व्हेइकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करणारी वाहने आदी जड, अवजड वाहनांसाठी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

Navale Bridge
Nashik: 2 रिंगरोडसाठी शिंदे सेनेच्या मंत्री-खासदारांमध्ये स्पर्धा

ही आहेत अपघाताची कारणे

कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती असते. यातून वाहनांचा वेग वाढतो. वाहनाला सतत ब्रेक लावल्यामुळे ब्रेकमध्ये अनावश्‍यक उष्णता व दाब निर्माण होऊन ब्रेक काम करेणासे होतात. हे देखील अपघातांचे महत्त्वाचे कारण ठरते.

Navale Bridge
चूक नसताना केलेले निलंबन भोवले; शिंदेंच्या 'त्या' मंत्र्याला दणका

कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस चौकी स्थापन करणे, त्या ठिकाणी सार्वजनिक उद्‍घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित करणे, स्वामिनारायण मंदिर ते दरी पूल या दरम्यान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरची संख्या वाढवणे, तातडीने मदत देण्यासाठी पोलिस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवणे, दरी पुलाजवळ सेवा रस्त्याला जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी हाईट बॅरिकेट्‌स बसवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यापुर्वीच दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com