Good News: रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरवात; कामाचा मुहूर्तही ठरला

Ring Road
Ring RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पातील (Pune Ring Road Project) बाधित गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, गावनिहाय सुनावणी प्रक्रियेद्वारे भूसंपादनाला सुरवात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

Ring Road
नाशिकमध्ये रिलायन्सच्या फार्मा कंपनीची ४२०० कोटींची गुंतवणूक

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेतला आहे. त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, राज्य सरकारकडून पुरवणी अंदाज पत्रिकेत दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Ring Road
पुणे महापालिकेत समाविष्ट 'या' 11 गावांसाठी गुड न्यूज! 400 कोटींतून

या प्रकल्पाचा खर्च सुमारे २२ हजार कोटी रुपये अपेक्षित असून, १० हजार २०० कोटी रुपये रस्ते महामंडळाला कर्ज देण्यास हुडकोने नुकतीच मान्यता दिली आहे. गरज पडल्यास हुडकोकडून वाढीव तरतुदीनुसार अधिक रकमेबाबत मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Ring Road
नाशिक जिल्हा परिषद उभारणार १०० आदर्श शाळा

महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बाधित होणाऱ्या सर्व गावांची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच, बाधित गावांची निवाडा प्रक्रिया सुरू असून, प्रांतनिहाय सुनावणी सुरू आहे. त्यानुसार भूसंपादन करणार आहे. जानेवारीपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे उदिष्ट असून, त्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com