Good News! पुणे महापालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर...

JOBS
JOBSTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महानगरपालिकेमध्ये लवकरच 893 चालकांची भरती केली जाणार आहे. पुणे शहरातील कचरा वाहतुकीसाठी तब्बल ३०.३९ कोटी रुपये खर्च करून ८९३ चालक घेण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत घेतला.

JOBS
मोठी बातमी! बेस्टचे 3675 कोटींचे 'हे' टेंडर 'ऑलेक्ट्रा'च्या खिशात

पुणे महापालिकेच्या ताफ्यात एकूण १३०० गाड्या आहेत. त्यासाठी कायम सेवेत असलेले ४२१ चालक आहेत. तर उर्वरित चालक हे कंत्राटी आहेत. पुणे शहरात रोज २२०० कचरा निर्माण होतो. शहराच्या विविध भागातील रॅम्प, कचरा प्रकल्पापर्यंत हा कचरा वाहून नेण्यासाठी मोठी घंटागाडी, डंपर, कॅम्पॅक्टर यासारख्या सुमारे ७५० वाहनांचा वापर केला जातो. यासाठी पूर्णपणे कंत्राटी कामगारांचा वापर केला जात आहे. ७५० वाहने असले तरी सुट्ट्यांचे नियोजन करून, साधारणपणे ८५० ते ९०० कर्मचाऱ्यांची गरज असते.

JOBS
BMCचा मोठा निर्णय! 'या' भागातील नागरिकांसाठी बांधणार 30 हजार घरे

महापालिकेने कचरा वाहतुकीसाठी चालक पुरविण्यासाठी निविदा काढली होती. त्यामध्ये २७ कोटी ६५ लाख १५ हजार ४४० रुपयेच इतकी तरतूद उपलब्ध आहे. यामध्ये दोन ठेकेदार मान्य झाले. त्यामध्ये श्री. एंटरप्रायझेस आणि जय भवानी एंटरप्रायझेस या दोन्ही ठेकेदारांनी प्रत्येकी ९.९२ टक्के जादा दराने निविदा भरली त्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये ८९३ वाहनचालक १२ महिन्यांसाठी पुरविले जाणार आहेत.

JOBS
ठाणे, पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी गुड न्यूज;रुग्णालयास 527 कोटी

दोन्ही ठेकेदारांची रक्कम सारखीच
चालक पुरविण्याच्या निविदेसाठी दोन ठेकेदारांनी अर्ज केले. विशेष म्हणजे दोघांनीही प्रस्तावित केलेली रक्कम ही १०० टक्के सारखी आहे. श्री एंटरप्रायझेस व जय भवानी एटरप्रायजेसने ३० कोटी ३९ लाख ४५ हजार ७७२ रुपये ४७ पैकी अशी एक सारखीच रक्कम नमूद केली. महापालिका प्रशासनाने ही निविदा एकालाच न देता दोघांना विभागून दिली आहे.

JOBS
मुंबई-पुणे प्रवासात 1 तास वाचणार! MTHL Extension बाबत मोठी बातमी

पीएमपीचे ८६ चालक परत
पीएमपीकडे अतिरिक्त झालेले २०० चालक महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यांना कचरा वाहतुकीच्या गाड्यांवर काम देण्यात आले होते. पण त्यापैकी ८६ चालकांनी हे काम करण्यास नकार दिला असून, त्यांना परत पीएमपीकडे पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल पीएमपीला देण्यात आला आहे, असे मोटर वाहन विभागाचे उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com