रेल्वे प्रवाशांसाठी Good News! गाड्यांची संख्या वाढणार, कारण...

Hadapsar Railway Station
Hadapsar Railway StationTendernama
Published on

पुणे (Pune) : रेल्वे प्रशासन हडपसर टर्मिनलचा (Hadapsar Railway Terminal) विकास करताना स्थानकावरील दोन स्टेबलिंग लाईनचा विस्तार थेट घोरपडी कोचिंग डेपो पर्यंत करणार आहे. त्यामुळे येत्या काळात हडपसर टर्मिनल वरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. शिवाय गाडी दुरुस्तीसाठी पुणे स्थानकावर न जाता थेट घोरपडी यार्डमध्ये गाडी घेऊन जाता येणार आहे.

Hadapsar Railway Station
Thane: नालेसफाईत कोणी केली 10 कोटींची हातसफाई?

पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनलच्या विकासावर भर दिला आहे. मागील दीड वर्षांपासून विविध कामे टर्मिनलवर केले जात आहे. हडपसर टर्मिनलसाठी सुमारे १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पैकी ४० कोटीचे काम झाले आहे. हडपसर हून रेल्वे वाहतूक वाढविण्यासाठी प्रवासी सुविधा वाढविण्यासोबतच स्टेबलिंग लाईन, पिट लाईन, लूप लाईन आदी सारख्या पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने दोन स्टेबलिंग लाईनचा विस्तार करण्याचे ठरविले आहे.

स्टेबलिंग लाईन म्हणजे काय?
रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी त्या स्थानकावर स्टेबलिंग लाईन व पिट लाइनची आवश्यकता असते. पिट लाइनवर रेल्वे डब्याची देखभाल व दुरुस्ती होते. तर स्टेबलिंग लाईन वर रेक ठेवला जातो. सोप्या शब्दांत रेकचे पार्किंग. स्टेबलिंग लाईन नसेल तर रेल्वे गाड्यांना रनिंग लाईन वर ठेवले जाते. त्यामुळे रनिंग लाईन ब्लॉक होऊन जाते. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे प्रमुख स्थानकावर स्टेबलिंग लाईन तयार केली जाते.

Hadapsar Railway Station
Nashik ZP : 2538 पदांची लवकरच आयबीपीएसच्या माध्यमातून भरती

१० कोटींचा खर्च अपेक्षित
हडपसर टर्मिनल येथे तयार करण्यात येणारे दोन स्टेबलिंग लाइनची लांबी सुमारे ५९० मीटरची आहे. यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्पलेक्स (जीसीएमसी) येथे पाच स्टेबलिंग लाईन व पाच पीट लाईन तयार केल्या आहेत. ज्या रेल्वेगाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स पुण्याकडे आहे, त्याची देखभाल दुरुस्तीचे काम जेसीएमसी येथे केले जाते.

Hadapsar Railway Station
EV: नाशिककरांना महिनाभरात मिळणार ही Good News; लवकरच निघणार टेंडर

हडपसर रेल्वे स्थानकावरून येत्या काळात रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या स्टेबलिंग लाईनचा विस्तार केला जाईल. त्यामुळे रेक ठेवण्याचा प्रश्न मिटेल. त्यासाठी रेकला पुणे स्थानकावर आणण्याची आवश्यकता भासणार नाही.
- डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com