विमानप्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता विमानतळावर...

Multilevel Parking
Multilevel ParkingTendernama
Published on

पुणे (Pune) : New Multilevel Parking At Pune Airport नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा प्रश्न सुटणार असून, शिवाय वाहनचालकांना नवी सुविधाही मिळणार आहे. विमानतळासाठी घरातून निघाल्यावर आपल्याला हवा असलेला पार्किंगचा स्लॉट निवडता येईल, शिवाय तो बुकही करता येणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पार्किंग बुक करता येणार आहे. त्यामुळे पार्किंग फूल होण्याची चिंता नाही. १ ऑक्टोबरपासून नवे मल्टीलेव्हल पार्किंग सुरुरू होत आहे.

Multilevel Parking
मेट्रोतील पुणेकरांवर येथून राहणार लक्ष; 15 दिवसांत येणार ट्रॅकवर..

प्रवाशांना सुविधा देताना नव्या संकल्पनांचा विचार करण्यात आला आहे. पार्किंगचा स्लॉट आधीच बुक करून ठेवणे, यासह पार्किंग शुल्क देताना यूपीआय ॲपच नाही तर टोलनाक्यांवर ज्याप्रमाणे कर आकारणी करताना फास्ट टॅगचा वापर केला जातो, त्याप्रमाणे पार्किंग शुल्कासाठी टॅग पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
पुणे विमानतळासमोर बांधण्यात आलेल्या मल्टीलेव्हल पार्किंगसाठी सुमारे १२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी एक हजार चारचाकी व एक हजार दुचाकी ठेवण्याची क्षमता आहे. केवळ पार्किंगच नाही तर या ठिकाणी फूड कोर्ट, ऑफिसेस, तसेच अन्य कमर्शिअल वापर होणार आहे. पार्किंगच्या शुल्कात कोणता बदल करण्यात आलेला नाही. पुर्वीचाच दर राहणार आहे.

Multilevel Parking
नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्यच झाले ठेकेदार?

नवे मल्टीलेव्हल पार्किंग १ ऑक्टोबरपासून वाहन चालकांच्या सेवेत येत आहे. विमानतळ प्रशासनाने त्याची तारीख ठरवली आहे. त्यासाठी पार्किंग ते विमानतळ जोडणारा पादचारी पूल बांधून पूर्ण झाला आहे. प्रवाशांना चढण्यास व उतरण्यासाठी सरकता जिनाही पादचारी पुलाला जोडला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच दोन ट्रॅव्हलेटर पादचारी पुलावर बसविणार आहे.
एक ऑक्टोबरपासून मल्टीलेव्हल कार पार्किंग सुरू होत आहे. पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या महिन्यात ट्रॅव्हलेटर बसविण्याचे काम पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार असल्याचे पुणे (लोहगाव) विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com