Good News! शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर 15 दिवसांत नवे फलाट

Shivajinagar Station
Shivajinagar StationTendernama
Published on

पुणे (Pune) : शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर लोकलसाठी नवे टर्मिनल बांधण्याचे काम ‘फास्ट ट्रॅकवर’ सुरू आहे. ‘ओएचई’च्या मास्टहेडसह ट्रॅकसाठी आवश्यक असलेले ‘अर्थओव्हर’चे काम पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्षात ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. फलाटवर येणाऱ्या ट्रॅकसाठी स्लीपर अंथरण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर ते स्लीपर रुळांना जोडून ट्रॅक तयार होईल. यासह बाजूचा फलाटदेखील बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Shivajinagar Station
नाशिक महापालिकेत 706 पदांची भरती; डिसेंबरमध्ये प्रक्रिया

पुणे स्टेशनवरील लोकलचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्टेशनवर ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट अर्थात लोकल) टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३३० मीटर लांबीचे नवीन फलाट तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येथून १५ डब्यांची लोकल सुटेल. हे टर्मिनल सुरू झाल्यावर लोणावळ्याला जाणाऱ्या सुमारे पंधरा लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटतील. परिणामी, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी होईल. केवळ ज्या लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो, त्याच लोकल पुणे स्टेशनवरून सुटतील. यामध्ये दुपारी पाचला पुण्याला पोहोचणाऱ्या लोकलचा समावेश आहे.

Shivajinagar Station
नाशिक मखमलाबादमधील 750 एकरावरील स्मार्टसिटी प्रकल्प गुंडाळणार

पुणे स्टेशनवरचा भार कमी व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. हडपसर व खडकी टर्मिनलसह शिवाजीनगर स्टेशवरचे ‘ईएमयू’ (लोकल) टर्मिनलदेखील याचाच भाग आहे. नव्या फलाटामुळे लोकलसाठी स्वतंत्र लाईन तयार होईल. त्यामुळे एक प्रकारच्या स्टॅब्लिंग लाइनसारखा त्याचा वापर होईल. परिणामी, शिवाजीनगरवरचा फलाट एक व दोन हा मेल एक्स्प्रेससाठी मोकळा राहील.
लोणावळ्याला जाणाऱ्या बहुतांश लोकल पुण्याहून सुटतात. यात अनेकदा शिवाजीनगरहून चढणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही. टर्मिनल पूर्ण होताच लोकल शिवाजीनगरहून सुटतील, त्यामुळे शिवाजीनगरच्या प्रवाशांना फायदा होणार आहे. त्यांना जागा उपलब्ध होईल.

Shivajinagar Station
पुणेरी मिसळ, पुणेरी पावभाजीच्या तुफान यशानंतर आता 'पुणेरी मेट्रो'!

शिवाजीनगर स्टेशनवरील लोकल टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. आता स्लीपर अंथरण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेरीस लोकल धावतील.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com