पुण्यात फ्लॅटच्या किमती तब्बल 8 टक्क्यांनी वाढल्या; हे आहे कारण?

Pune - PCMC
Pune - PCMCTendernama
Published on

पुणे (Pune) : पुण्यात मागील वर्षीच्या तुलनेत नव्या सदनिकांची मागणी वाढली असून, त्यांची उपलब्धताही वाढली आहे. मात्र, नवे घर खरेदी करणारांसाठी वाईट बातमी आहे, कारण नव्या घरांची मागणी वाढलेली असतानाच घरांच्या किमतीतही वाढ झाली असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. (Flat Rates In Pune News)

Pune - PCMC
मुख्यमंत्र्यांचे ठाण्याला पहिले गिफ्ट; सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे

कोरोनामुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या स्वतःच्या घरांची गरज पूर्ण करण्यासाठी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी तयारी केली आहे. त्यामुळे सदनिकांचे बांधकाम होण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा १०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत ५४ हजार ८४५ सदनिका विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या वर्षी हा आकडा २६ हजार ६११ इतका होता.

Pune - PCMC
नागपुरात 'गडकरी इफेक्ट'; घोषणेनंतर अवघ्या 2 महिन्यांत काम सुरू!

पुण्यातील निवासी बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेणारा जानेवारी ते जून २०२२ या कालावधीतील ‘गेरा पुणे रेसिडेन्शियल रियल्टी’ हा अहवाल नुकताच ‘गेरा डेव्हलपमेंट्स’ने जाहीर केला आहे. शहराच्या मध्यभागापासून ३० किलोमीटरच्या अंतरात असलेल्या प्रकल्पांचा या अहवालात समावेश आहे. त्यात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

Pune - PCMC
मालमत्ता कर वाढीसाठी वसई-विरार पालिकेचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी

जुलै २०२० ते जुलै २०२१ दरम्यान एकूण ६४ हजार ६७१ सदनिका उपलब्ध झाल्या आहेत. जुलै २०२१ ते जून २०२२ दरम्यान विक्रीस असलेल्या घरांची संख्या ८० टक्क्यांनी वाढून एक लाख १५ हजार ९९६ इतकी झाली आहे. एका वर्षांच्या कालावधीत पुण्यात लॉन्च झालेल्या घरांची ही सर्वाधिक संख्या आहे. तर विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरांची संख्या ७४ हजार ८१८ इतकी आहे. जून २०१६ शी तुलना केली असता ही संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. २०१६ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांची संख्या एक लाख ७ हजार ४०२ इतकी होती.

Pune - PCMC
औरंगाबाद की 'कचराबाद'! कोट्यवधींचा मलिदा कोण खातय?

प्रकल्पांचे चार टप्प्यांत वर्गीकरण

- लवकर उपलब्ध होत असलेले

- बांधकाम मध्यात आहेत असे

- बांधकाम अंतिम टप्प्यात असलेले

- सदनिका विक्रीसाठी तयार झालेले

Pune - PCMC
सीएनजी पाईपलाईन बुजवण्यात कुचराई; अपघातांचा धोका

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे :

- जून अखेर विक्रीसाठी उपलब्ध सर्व युनिटपैकी लॉन्च झालेल्या सदनिका २७ टक्के

- वर्षभरापूर्वी या सदनिकांची टक्केवारी १९.१२ इतकी होती

- सदनिकांचा पुरवठा आणि मागणी या दोन्हींतही वाढ

- नवीन प्रकल्पांत काही ठिकाणी किंमती १२ महिन्यांत २४ टक्क्यांनी वाढल्या

- सरासरी किंमत १० हजार रुपये चौरस फूट असलेले ७० प्रकल्प लॉन्च

Pune - PCMC
औरंगाबादेत एकाच ठेकेदाराला दोन्ही टेंडर देण्यासाठी नियमांना बगल?

घरांच्या किमतीत वाढ

गेल्या १२ महिन्यांत संपर्ण शहरातील घरांच्या किमती ८.११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. महागडी घरी (सरासरी किंमत १० हजार रुपये चौरस फूटापेक्षा जास्त) असलेले ७० प्रकल्प लॉन्च झाले आहेत.

Pune - PCMC
मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत 'या' मोठ्या प्रकल्पाची घोषणा

गेल्या दोन वर्षांपासून घरांच्या किमती वाढत असल्याचे दिसते. हे एक चांगले लक्षण आहे. कारण घर घेण्याची परवडणारी क्षमता देखील सध्या उच्चांकांच्या जवळ आहे. विक्री आणि नवीन प्रकल्पांची सुरुवात देखील उच्च स्तरावर आहे. गेल्या १२ महिन्यांत १ लाख १५ हजारांहून अधिक घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तर १ लाख ५ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली. या दोन्ही संख्या उच्चांकी आहेत.

- रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट्स

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com