पूल पाडला तरी 'या' बॉटलनेकमुळे चांदणी चौकातील कोंडी फुटेना

Chandni Chowk
Chandni ChowkTendernama
Published on

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) एनडीए पाषाण पूल पाडला असला तरीही मुंबईकडून साताऱ्याच्या (Mumbai To Satara) दिशेने जाताना झिनिया सोसायटीपासून पुढे मुळशीकडून येणाऱ्या उड्डाणपुलाच्या शेजारी रस्ता रुंदीकरण रखडलेले आहे. महापालिकेने या ठिकाणचे भूसंपादन पूर्ण करून ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) हस्तांतरित केली. पण NHAIने काम सुरू न केल्याने सहा पदरी असलेला महामार्ग सोसायटीपासून पुढे केवळ दोन पदरीच होतो. त्यामुळे मोठा गाजावाजा करून चौकातील पूल पाडला असला तरी साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील ‘बॉटलनेक’ कायम आहे.

Chandni Chowk
'समृद्धी' तयार करताना सांगितला वेग ताशी १५० पण नव्या सूचनेनुसार...

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून ‘एनएचएआय’कडून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजेच गेल्याच आठवड्यात येण्याची ‘एनएचएआय’ने ‘एनडीए-पाषाण’ यांना जोडणारा महामार्गावरील पूल स्फोट करून पाडून टाकला. या ठिकाणी आता उर्वरित खडक फोडून रस्ता मोठा करण्याचे काम सुरू आहे. हा खडक फोडल्यानंतर अतिरिक्त दोन लेन उपलब्ध होतील, त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी सुटेल असा दावा एनएचएआय व वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही केला आहे. पण पूल पाडल्यानंतरही या चौकातील वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे.

Chandni Chowk
बेकायदा बांधकाम करणारांनो आता सावधान! आता ड्रोन, उपग्रहाद्वारे...

हे आहे अडथळे...
- चांदणी चौकात अतिरिक्त दोन लेन उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना होणार आहे. पण मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या प्रवासातील अडथळे अद्याप कायम आहेत.
- साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर मुळशीकडून येणारा उड्डाणपूल उतरवण्यात आला आहे. त्यामुळे येथील महामार्गाची रुंदी कमी झाली असून, केवळ दोन ते अडीच लेन वाहनांसाठी उपलब्ध आहेत
- झिनिया सोसायटीपासून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या सुमारे २०० मीटरच्या रस्त्याचे काम अद्यापही झालेले नाही
- एकीकडे उड्डाणपुलामुळे महामार्गाची रुंदी कमी झालेली आहे व दुसरीकडे येथे सर्व्हिस रस्ताच उपलब्ध नाही
- झिनिया सोसायटीच्या समोर बॉटलनेक झालेला असल्याने गर्दीच्या वेळेला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात
- सध्या या ठिकाणी मोठा खड्डा खोदलेला आहे, पण मोठ्या प्रमाणात पडलेला राडारोडा, खोलगट भाग, तेथील झाडे यामुळे तेथे रस्ता अस्तित्वातच नाही
- हे काम करण्यासाठी किमान दोन ते अडीच महिने लागू शकतात

Chandni Chowk
देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी आहे ना!, विशेष निधीची गरज काय?

झिनिया सोसायटी ते मुळशीकडून येणारा उड्डाणपूल संपतो तिथपर्यंत डाव्या बाजूने सुमारे १२ मीटरचा सर्व्हिस रस्ता केला जाणार आहे. त्या ठिकाणी सध्या खोलगट भाग आहे व त्यास लागून बंगले आहेत, त्यामुळे तेथे भराव टाकणे शक्य नसल्याने या खोलगट भागात पिलर टाकून छोटा पूल बांधला जाईल व त्यावरून सर्व्हिस रस्ता करण्याचे नियोजन असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Chandni Chowk
गोरगरिबांना 'दिवाळी किट'चे टेंडर 'या' कंपनीकडे; ५१३ कोटींचा खर्च

मुंबई ते सातारा या दिशेने जाणाऱ्या महामार्गाच्या लगत आवश्‍यक असलेले भूसंपादन १०० टक्के पूर्ण करून ही जागा ‘एनएचएआय’ला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे तेथे काम करणे शक्य आहे. या प्रकल्पात सध्या वेदभवन व मुळशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीचे भूसंपादनासंदर्भात न्यायालयात याचिका आहेत म्हणून ते पूर्ण झालेले नाही.
- प्रतिभा पाटील, उपायुक्त, भूसंपादन विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com