'या' कारणामुळे झोपडपट्टीमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात येईना?

SRA
SRATendernama
Published on

पुणे (Pune) : मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune And Pimpri Chinchwad) शहरातील झोपडीधारकांना २६९ चौरस फूट (२५ चौरस मीटर) ऐवजी ३०० चौरस फुटाची (२७.८८ चौरस मीटर कार्पेट) सदनिका मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून देखील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) सुधारित बांधकाम नियमावलीच्या अंतिम प्रस्तावास पाच महिन्यानंतरही मान्यता देण्यास राज्य सरकारला वेळ नाही. त्यामुळे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचे स्वप्न हे कागदावरच राहिले आहे.

SRA
'पाणीपुरवठा'चे प्रधान सचिव औरंगाबादेतील अधिकाऱ्यांवर का भडकले?

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी २००५ मध्ये राज्य सरकारकडून एसआरएची स्थापन केली. या प्राधिकरणामार्फत २००८ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी नियमावलीही तयार केली. त्यामध्ये झोपडीधारकांना २५ चौरस मीटर क्षेत्रफळाची सदनिका मोफत देण्याची, तसेच त्यासाठी जास्तीत जास्त तीन एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्याची तरतूद केली होती. मात्र २०१५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने त्यामध्ये सुधारणा करीत अशा प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या एफएसआयमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्पांचे काम ठप्प पडले होते.

SRA
Good News! 'लालपरी'चा लवकरच डिझेलला 'टाटा'; असा होणार बदल...

दरम्यान, राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर प्राधिकरणाच्या नियमावलीत बदल होणे, अपेक्षित होते. परंतु, तत्कालीन सरकारने अशा प्रकल्पांसाठी नवीन फॉर्म्युला वापरून बांधकामास परवानगी देण्याचे आदेश काढले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या योजनेत अडचणीत आल्या. या पार्श्‍वभूमीवर प्राधिकरणाकडून सुधारित नियमावली तयार करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली होती. त्यास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मान्यता दिली. ही मान्यता देताना नियमावलीचे प्रारूप प्रसिद्ध करून हरकती-सूचना दाखल करण्याचे आदेश दिले होते.

SRA
मुंबई ते हैदराबाद अवघे साडेतीन तासात; 'यामुळे' होणार शक्य

त्यानुसार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्राधिकरणाने प्रारूप नियमावली जाहीर करून हरकती-सूचना मागविल्या. त्यावर सुनावणी घेऊन जानेवारी महिन्यात अंतिम मान्यतेसाठी नियमावलीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून सरकारला सादर केला. त्यास पाच महिने होऊन गेले. राज्य सरकारने मध्यंतरी नियमावलीतील २६९ चौरस फूटाऐवजी ३०० चौरस फुटाची सदनिका मोफत देण्याच्या तरतुदीस केवळ मान्यता दिली. उर्वरित नियमावली अद्यापही मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.

SRA
पुणे-नाशिक प्रवास अवघ्या पावणे दोन तासांत; कसा?

झोपडपट्ट्यांची संख्या

पुणे : ४८६

पिंपरी-चिंचवड : ७१

झोपडीधारक

पुणे, पिंपरी-चिंचवड : दहा लाखांहून अधिक

पंधरा वर्षात झोपडीधारकांचे पुनर्वसन : ८ हजार ३४३

SRA
'टेंडरनामा' IMPACT : सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेला निर्देश

सर्व राजकीय पक्षांना केवळ झोपडीधारकांची मते हवी आहेत. परंतु त्यांच्यासाठीचे निर्णय घेण्यास वेळ नाही. राज्य सरकारने तातडीने सुधारित नियमावलीस मान्यता द्यावी. जेणेकरून झोपडीधारकांचे पुनर्वसनाचे काम मार्गी लागण्यास मदत होईल.

अस्लम शेख, झोपडीधारक

SRA
तगादा : धक्कादायक! नागपूर जिल्ह्यातील २६ गावांत 'ही' समस्या

पुनर्वसन योजनेला सर्वांनी मान्यता दिली आहे. परंतु योजनेचे काम होऊ शकत नाही. कारण सुधारित नियमावली आली नाही, असे कारण पुढे करण्यात येत आहे. अजून किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे. सरकार झोपडीधारकांचा विचार करणार आहे की नाही.

जयंत पवार, झोपडीधारक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com