सोय कमी, गैरसोयच जास्त; रेल्वेच्या उदासीनतेमुळे प्रवाशीच सायडींगला

Railway Station
Railway StationTendernama
Published on

पुणे (Pune) : रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले रेल्वे प्रकल्प प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या वर्षी तरी साईड ट्रॅकवरच राहिले. यात स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग असो अथवा शिवाजीनगर स्थानकावर लोकलसाठी नवे टर्मिनल बनविण्याचे काम असो. हडपसर स्थानकांवर फलाट दोन व तीनचे विस्तारीकरण झाले. मात्र स्टेबलिंग लाइनचे काम अर्धवटच राहिले. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्थानकावर लिफ्ट बसविण्याचा निर्णय झाला. मात्र प्रत्यक्षात कामाची सुरवात झाली नाही. उलट रॅम्प बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोयच झाली.

Railway Station
नगर-मराठवाड्याने का ठोकलाय नाशिक विरुद्ध शड्डू? नेमका काय आहे वाद?

पुणे स्थानक यार्ड रिमॉडेलिंग :
- डब्यामध्ये वाढ करण्यासाठी व होम सिग्नलवर फलाट नसल्याने थांबणाऱ्या रेल्वेसाठी पुणे स्थानकाच्या फलाटाचे विस्तारीकरण करणे गरजेचे
- रेल्वे बोर्डकडून २०१६-१७ साली पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगला मंजुरी
- २०२२ साली ५२ कोटींपैकी ३१ कोटींचा निधी प्राप्त
- ऑक्टोबरमध्ये कामास सुरुवात होणार होती मात्र, डिसेंबर संपत आला तरी सुरूवात नाही
- सुमारे २६ आठवडे काम चालणार

हडपसर टर्मिनल :
- प्रवाशांना आवश्यक प्राथमिक सुविधाही नव्हती. रेल्वे राज्य मंत्र्याच्या हट्टामुळे हडपसर-नांदेड रेल्वे सुरू
- नांदेड एक्सप्रेसच्या सेवेनंतर नव्या सुविधांची घोषणा. मात्र, प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली
- स्टेबलिंग लाईन, फलाटावर शेड आदी कामे झालीच नाही
- पार्किंगची जागा नसल्याने स्थानका समोरची रेल्वे कर्मचाऱ्यांची इमारत पाडून, त्या जागी पार्किंग करण्याचा निर्णय, अंमलबजावणी शून्य.
- हडपसर स्थानकावरून प्रवास करणे प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरते

Railway Station
नाशिक मनपातील 'या' 2 विभागांत तब्बल 706 जागांची मोठी भरती

शिवाजीनगर लोकल टर्मिनल :
- स्थानकावरून लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी स्वतंत्र टर्मिनलचे काम सुरू
- डिसेंबरमध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित, मात्र अजूनही हे काम सुरूच
- डिसेंबरमध्ये लोकलची सेवा शिवाजीनगर स्थानकावरून सुरू होणार नाही हे निश्चित

पुणे स्थानकावर लिफ्ट :
- स्थानकावरच्या प्रत्येक फलाटावर लिफ्ट बसविण्याचा निर्णय
- वर्ष संपत आले तरी प्रत्यक्षात कामास सुरूवात नाही
- लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचे हाल
- तीन सरकते जिने बसविले असले तरी ते अपुरे

Railway Station
'या' कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; ओमप्रकाश बकोरियांची मोठी घोषणा...

पुणे रेल्वे स्थानक :
- दैनंदिन प्रवासी रेल्वे : २५०
- प्रवासी संख्या : दीड लाख.
- एकूण फलाट : सहा
- लोकलची संख्या : ४१
- फलाट नसल्याने रोज : ७० रेल्वेला उशीर
- अतिरिक्त डबे जोडू शकत नसलेले रेल्वे : ४०
- कमी डब्यांचा परिणाम : रोज १८ हजार प्रवाशांना फटका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com