खटक्यात 'गुगल-पे' करा अन् झटक्यात पुणे मेट्रोने फिरा!

Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी महामेट्रोने (MahaMetro) गेल्या आठवड्यात पुणे शहरातील मेट्रो स्थानकांमध्ये १२ डिजिटल किऑस्क बसविले आहेत. त्यातून गुगल-पेचा वापर करूनही तिकीट खरेदी करता येईल. (12 Digital Kiosks At Metro Stations In Pune City)

Pune Metro
नागपूर-पुणे ८ तासात सुपरफास्ट; असा आहे नितीन गडकरींचा मास्टरप्लॅन

महामेट्रोने शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. डिजिटल किऑस्क हे स्वयंचलित आहे. त्यावरील क्यू-आर कोड करून प्रवासी तिकीट घेऊ शकतात. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे तपशील नमूद केल्यावर त्यांना पेमेंट झाल्यावर प्रवासाचे तिकीट उपलब्ध होईल. नजीकच्या काळात प्रवासी बँकेच्या डेबिट कार्डने देखील पेमेंट करून तिकीट खरेदी करू शकतील. डिजिटल किऑस्कमध्ये तिकीट घेण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये सूचना असलेली टच स्क्रीन सुविधा आहे.

Pune Metro
पुणेकरांसाठी गुड न्यूज; लवकरच निघणार रिंगरोडचे टेंडर

तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवासी एटीएमच्या धर्तीवर डिजिटल किऑस्क सहज हाताळू शकतात. डिजिटल किओस्कमध्ये प्रत्यक्ष तिकिटे, तसेच डिजिटल तिकिटे (व्हॉट्सअॅपवरून तिकीटे) मिळू शकतात. या शिवाय प्रत्येक स्थानकावर तिकीट खिडकी असेल. तेथूनही प्रवासी तिकीट खरेदी करू शकतात. तसेच पुणे मेट्रोच्या ॲपवरूनही प्रवाशांना तिकीट खरेदी शक्य आहे.

Pune Metro
महागड्या ई-बस घेऊन PMPचा भार वाढवू नका; बकोरियांचा पालिकेला सल्ला

‘‘या किऑस्कमुळे प्रवाशांना मेट्रो प्रवासाचे तिकीट आता सहज उपलब्ध आहे. पुण्यातील मेट्रो शिवाजीनगर न्यायालयापर्यंत आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोही लवकरच शिवाजीनगर न्यायालयापर्यंत धावणार आहे,’’ असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com