Pune : विद्यापीठ चौकातील पुलाची अखेर अंतिम तारिख ठरली; आयुक्तांच्या सूचना

SPPU
SPPUTendernama
Published on

पुणे (Pune) : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋषी चौक) दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०२४ ही अंतिम तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा कार्यान्वित करून आणि अतिरिक्त मनुष्यबळ वापरून हे काम वेळेत पूर्ण करा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिल्या.

SPPU
Good News : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचा 'तो' 42 किमी टप्पा खुला करण्याचे प्रयत्न

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून तेथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना यापूर्वी झालेल्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुमटा) बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र विद्यापीठ चौकातील रस्तारुंदी करण्यापासून ते जलवाहिनी हलविणे ही कामे महापालिकेकडून वेळेत पूर्ण करण्यात आली नाहीत, तसेच वाहतूक पोलिसांकडूनदेखील चौकातील कामासाठी परवानगी देण्यात विलंब झाला. त्यामुळे पुलाचे काम सुरू करण्यास उशीर झाला.

SPPU
Pune : 'तो' पंचतारांकित पाहुणचार पुणे महापालिकेला पडला 30 लाखांना!

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात नुकतेच लक्ष घालून तातडीने पुलाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते, या कामासाठी संबंधित विभागांनी तातडीने परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्याने पुलाचे काम अखेर चालू झाले. आज पुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुमटा’ची बैठक झाली. त्यामध्ये विभागीय आयुक्त राव यांनी ‘पीएमआरडीए’ला या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०२४ ची डेडलाईन निश्‍चित करून दिली. यावेळी महापालिका आणि ‘पीएमआरडीए’चे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

SPPU
Pune : प्रवाशांची संख्या वाढल्याने PMPMLचा मोठा निर्णय; तब्बल 'एवढ्या' बस रस्त्यावर

वाहतुकीचे नियोजन करावे

विद्यापीठ चौकातील पुलाचे तसेच औंध, बाणेर आणि सेनापती बापट रस्त्यावरील रॅम्पचे काम सुरू करण्यासाठी आवश्‍यक त्या रस्तारूंदीचे काम महापालिकेने १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे. हे काम सुरू झाल्यानंतर चौकात वाहतुकीची कोंडी होणार नाही, यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन करावे, तर दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी सध्या असलेल्या यंत्रणेत वाढ करावी, अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन काम मुदतीत पूर्ण करावे, अशा सूचना राव यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com