ठेकेदारांनो, पुणेकरांचे कंबरडे मोडले; पहिल्याच पावसात रस्त्यांची..

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : आधीच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची चाळण झालेली असताना आता त्यात चुकीच्या पद्धतीने सांडपाणी आणि पावसाळी गटाराच्या चुकीच्या कामामुळे पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. रस्त्याला समपातळीत चेंबर नसल्याने धक्के तर बसत आहेतच, पण चेंबरचे झाकण तुटणे, भोवती खड्डे पडणे हे प्रकार वारंवार घडत आहे. यासाठी दरवर्षी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.

Pune
आठवडाभरच पाऊस, काय ते रस्ते अन् खड्डे ठेकेदाराचं काम एकदम 'ओक्केच'

यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच पाऊस असताना महापालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे. जुना रस्ता असो किंवा अवघ्या काही आठवड्यांपूर्वी केलेला रस्ता असो या सर्वच डांबरी रस्त्यांवर खड्डे पडल्याने अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे. एकामागे एक सलग खड्डे असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. पाठीला हादरे बसून त्याचाही त्रास होत आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे त्रास होत असताना आता ज्या ठिकाणी रस्ते चांगले आहेत, तेथे सांडपाणी व पावसाळी गटारांच्या चेंबरने रस्त्यांची वाट लावली आहे.

Pune
पुणे महापालिकेचा दणका! रस्ता खोदणाऱ्या कंपनीला 9.5 लाखांचा...

महापालिकेकडून शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर खोदकाम करून सांडपाणी व पावसाळी गटारांचे काम केले आहे. या गटारांचे भूमिगत पाइप साफ करता यावेत, यासाठी ठराविक अंतरावर चेंबर तयार करून त्यावर झाकण लावले जाते. हे चेंबर तयार करताना रस्त्याला समपातळी असणे गरजेचे आहे. पण, पथ विभाग आणि मलःनिसारण विभाग यांच्यात समन्वय नसल्याने शहरात ठिकठिकाणी हे चेंबर एक तर रस्त्यापेक्षा खाली आहेत किंवा रस्त्याच्या पातळीपेक्षा वर आहेत. महापालिकेकडून डांबरीकरण केल्यानंतर चेंबरचेही काम करणे आवश्‍यक असते, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

Pune
पुणे जिल्ह्यातील प्रॉपर्टी कार्डमुळे भूमी अभिलेखला 'एवढा' महसूल

निकृष्ट चेंबरमुळे झाकण तुटण्याचे प्रमाण वाढले

चेंबर तयार करताना वाहतुकीचा ताण सहन करण्याची क्षमता त्यामध्ये असली पाहिजे. पण रस्त्याच्या कडेने सांडपाणी व पावसाळी वाहिनी न टाकता ती मध्यभागी टाकल्याने वरून टँकर, डांबर, पीएमपी बससारखे अवजड वाहने जात आहेत. त्यामुळे चेंबर खचणे, झाकण तुटणे असे प्रकार होत आहेत. त्यानंतर याच्या दुरुस्तीसाठी चार-पाच दिवस वाट पहावी लागत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

चेंबरच्या बाजूनेच खड्डे

चेंबरच्या बाजूने मुरूम व डांबर टाकून व्यवस्थित दबाई केली जात नसल्याने चेंबरच्या बाजूने खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी जमा होत असल्याने अपघात होत आहेत. पण महापालिका

खड्डे बुजविण्याचे काम सुरु

पहिल्यात पावसात शहरातील रस्त्यांची वाट लागल्याने मंगळवारी (ता.१२ ) रात्रीपासूनच मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेच्या कामाचा वेग संथ असल्याने मंगळवारी दिवसभरात १३३ पैकी केवळ ५३ खड्डेच प्रशासनाने बुजविले आहेत. आठवडाभरापासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे, त्यातच गेले दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. वर्षभर रस्त्यावर झालेल्या खोदकामानंतर महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरण करून रस्ते चकाचक केल्याचे सांगितले होते. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यांची पोलखोल झाली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांसह पेठांमधील गल्लीबोळ, उपनगरांमधील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी घसरत आहेत. पुणेकरांनी महापालिकेच्या या कामावर टीका सुरू केलेली असताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यापर्यंतही या तक्रारी पोचलेल्या आहेत. त्यांनी शहरातील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेत शुक्रवारपर्यंत (ता. १५) खड्डे बुजविण्यासाठी नियोजन केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com