पुणे महापालिकेत 'इंटरेस्ट'मुळे भाजप आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी

BJP, NCP

BJP, NCP

Tendernama

Published on

पुणे (Pune) : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शहरात एकमेकांचे प्रमुख विरोधक असले तरी सभागृहात ‘लाखमोला’चे निर्णय घेताना मात्र त्यांच्यातील मैत्रीचे दर्शन होते. महापालिकेची (Pune Municipal Corporation) निवडणूक तोंडावर आलेली असताना इंटरेस्टचे विषय मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेस व शिवसेनेला (Shivsena) बाजूला सारत भाजपशी हातमिळवणी केली. सुदर्शन केमिकल ते संगमवाडी पर्यंत मुळा-मुठा नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी मंजूर केला तर बिबवेवाडी येथील रस्त्याचा प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला.

BJP, NCP

आदिवासींच्या योजनेवर २३३ कोटींचा दरोडा?; टेंडरशिवाय कंत्राटाचा घाट

बिबवेवाडी- कोंढवा रस्ता ते गंगाधाम- शत्रुंजय मंदिर रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणारा प्रस्तावित २४ मीटरचा रस्ता कलम २०५ अन्वये आखण्यात आला आहे. यासाठी काढण्यात आलेले टेंडर वादग्रस्त ठरल्याने ती रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पण भाजपने हाच विषय शहर सुधारणा समिती, स्थायी समितीची मान्यता मिळवून गुरुवारी सर्वसाधारण सभेची मान्यतेसाठी आणला. हा प्रस्ताव येताच सभागृहनेते गणेश बीडकर यांनी गडबडीत मंजूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यास राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने विरोध केला. बहुमताच्या जोरावर भाजपने त्यास मान्यता दिली. त्यामुळे रस्ता तयार करण्यासाठी प्रशासनास रिटेंडर राबवावे लागणार आहे. यासाठी सुमारे ९० कोटीचा खर्च अपेक्षीत आहे.

BJP, NCP

पुणे महापालिकेचा टेंडर न काढताच डायरेक्ट खरेदीचा प्रस्ताव

सुदर्शन केमिकल ते संगमवाडीपर्यंत रस्ता व मुळा मुठा नदीवर पूल बांधणे हा विषय देखील कलम २०५ अन्वये करण्याचा प्रस्ताव सभेत आला. हा प्रस्ताव मंजूर करणे राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांनी बिबवेवाडीच्या प्रस्तावास भाजपला जास्त विरोध केला. त्यामुळे संगमवाडीचा विषय मंजूर करताना दोन्ही पक्षांना एकत्र येणे सोपे झाले, मात्र या विषयावर देखील भाजपने एकाही नगरसेवकाला चर्चा करू दिली नाही. यावर काँग्रेसने किमान भाजपच्या तरी नगरसेवकांना हा विषय समजू द्या, असा टोला मारला. अखेर भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येऊन बहुमताने विषय मंजूर केला तर काँग्रेस व शिवसेनेने विरोध केला.

BJP, NCP

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टोलची..

महाराजांच्या नावाने अचानक तहकुबी
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना ही छोटी घटना आहे’, असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सभा तहकूब करावी, असा विषय सकाळी साडे अकरा वाजल्यापासून दोन तासांत कोणी काढला नाही.मात्र, बिबवेवाडीच्या रस्त्याचा विषय येताच बागूल यांनी गडबडीने सभा तहकुबी मांडली. आत्ताच्या आत्ता तहकुबी वाचून त्यावर मतदान घ्या अशी भूमिका घेतली. पण भाजपने ती मान्य न करता कामकाज केले. महत्त्वाचे विषय मान्य झाल्यानंतर ही तहकुबी मान्य केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com