शिवाजीनगर मेट्रो स्टेशनबाबत मोठी अपडेट! मुहूर्त ठरला?

Shivajinagar Metro Station
Shivajinagar Metro StationTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील सर्वांत मोठ्या शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकात (Shivajinagar Underground Metro Station) तब्बल १२ सरकते जिने (एक्सलेटर), ५ लिफ्ट बसविण्याचे काम आता सुरू झाले आहे. आणखी एक महिन्यांत या स्थानकाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर पिंपरीवरून सुटलेली मेट्रो शिवाजीनगरपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा होईल. या स्थानकात शिवकालीन आणि पेशवेकालीन परिस्थितीशी साधर्म्य दाखविणारी संरचना करण्यात येणार आहे. (Pune Metro)

Shivajinagar Metro Station
निफाड साखर कारखाना चालविण्याचे 25 वर्षांचे टेंडर 'या' कंपनीकडे

मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकातून हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गही जोडण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील प्रवाशांना दोन्ही मेट्रोतून प्रवास करता येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्थानकाला तीन प्रवेशद्वारे असतील. त्यामुळे एसटी स्थानक, रेल्वे स्थानक, पीएमपीचे प्रवासी यांनाही मेट्रोतून प्रवास करता येईल आणि मेट्रोतील प्रवाशांनाही त्यांचा वापर करता येईल.

शिवाजीनगर भूमिगत स्थानकाचे काम पुढील महिनाअखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान मेट्रो धावेल. दरम्यानच्या काळात खडकी, रेंजहिल्स स्थानकांचे काम रेंगाळले तरी, उर्वरित स्थानकांचे काम वेळेत पूर्ण होईल आणि या मार्गावरील वाहतूक सुरू होईल. या मार्गावर मेट्रो कधी सुरू करायची, या बाबतचा निर्णय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि दोन्ही महापालिका घेतील, असेही त्यांनी नमूद केले.

Shivajinagar Metro Station
'या' कारणांमुळे त्र्यंबकेश्‍वर मंदिर देवस्थानचे लाखो रुपये वाया

या स्थानकावर एका तासाला सुमारे ३० हजार प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल. तसेच जमिनीखाली सुमारे २८ मीटरवर दोन मजले असतील. पहिल्या मजल्यावर तिकिट काऊंटर आणि त्याखालील मजल्यावर मेट्रो मार्ग असेल. प्रवाशांसाठी १२ सरकते जिने आणि ५ लिफ्ट स्थानकात आहेत, असेही दीक्षित यांनी सांगितले. स्थानकाच्या वरील जागेत शिवचरित्रातील आधारित प्रसंगांवर सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Shivajinagar Metro Station
BKCतील 'त्या' भूखंडांना प्रति चौमी ३ लाख ४४ हजारांचा दर; MMRDAच्या

दोन रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होणार

- शिवाजीनगरमध्ये सिमला ऑफिस चौकातून एसटी स्थानकाच्या रस्त्याकडे जाण्यास रस्ता सध्या बंद आहे. हा रस्ता पुढील महिन्यात खुला होईल. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.

- मुंबई-पुणे रस्त्यावरून शहरात येताना मेट्रोच्या कामामुळे वाहनचालकांना सध्या खडकीमध्ये वळसा घालून जावे लागते. तेथून पुन्हा अंडी उबवणी चौकात यावे लागते. या रस्त्यावरील मेट्रोचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल, अशीही माहिती दीक्षित यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com