Baramati News : बारामतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या 'त्या' प्रकल्पाचे Tender लवकरच

CCTV
CCTVTendernama
Published on

Baramati News बारामती : आचारसंहितेनंतर बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा (CCTV) प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाचे टेंडर आचारसंहितेनंतर निघणार आहे. त्यामुळे बारामतीची कायदा आणि सुव्यवस्था या प्रकल्पानंतर अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. (Baramati, Ajit Pawar, CCTV Tender News)

CCTV
Konkan Costal Highway News : मुंबई ते सिंधुदुर्ग सुसाट; कोकणातील 'त्या' 2 खाडीपुलांसाठी दिग्गज कंपन्यांमध्ये स्पर्धा

शहराच्या विविध भागात ३१५ कॅमेरे बसविले जाणार असून यामुळे प्रत्येक ठिकाणच्या हालचालींवर २४ तास नजर असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरवातीचा मर्यादित असलेला हा प्रकल्प व्यापक करण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून बारामतीचा हा प्रकल्प टेंडरस्तरापर्यंत येऊन पोहोचला आहे.

टेंडर निघाल्यानंतर विहित मुदतीत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर संबंधित एजन्सीला पाच वर्षांसाठी हा प्रकल्प दुरुस्ती देखभालीसाठी हस्तांतर केला जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

CCTV
Pune Bengaluru Expressway News : पुणे-बंगळूर सुसाट; 50 हजार कोटींच्या द्रुतगती महामार्गाचे काम सुरू

बारामती शहर, बारामती तालुका आणि माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारामती शहराच्या विविध भागात ३१५ कॅमेरे बसविले जाणार असून यामुळे प्रत्येक ठिकाणच्या हालचालींवर २४ तास कॅमेऱ्याची नजर असेल. त्यामुळे गुन्हेगार या कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. नंबरप्लेट व दुचाकीवरील माणसाचा चेहरा अचूकपणे कैद करणारे कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसविणार असल्याने पोलिसांना त्याचा तपासात चांगला फायदा होणार आहे.

या साठी बारामती शहर आणि पंचक्रोशीतील ११३ ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली असून प्रकल्पाच्या टेंडर निश्चित झाल्यानंतर या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम सुरु होईल. पोलिस स्थानकासह नगरपालिकेतही याचा नियंत्रण कक्ष उभारला जाणार असून पोलिस एका जागेवर बसून वाहतुकीबाबत पब्लिक अँड्रेस सिस्टीमवरुन सूचना करू शकतील.

CCTV
Mumbai Ahmedabad Bullet Train News : समुद्राखाली तयार होतोय बोगदा; काम युद्धपातळीवर सुरू

अशी असेल कॅमेरांची संख्या

- बुलेट - २२४

- कँटीलिव्हर - ४०

- पीटीझेड - ५६

- एएनपीआर - ३५

- पब्लिक अँड्रेस सिस्टीम - ३१

- डिजिटल साईन बोर्ड - ५

- पीटीझेड, व्हीटीएस कॅमेरा पोलिसांच्या सर्व वाहनांवर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com