वाईट बातमी! बकोरियांची बदली अन् पुन्हा PMP बसचे ब्रेकडाऊन वाढले

Omprakash Bakoria PMP
Omprakash Bakoria PMPTendernama
Published on

पुणे (Pune) : पावसाळा सुरू झाला की बसथांब्यावर उभा असलेला प्रवासी असो की बसमधून प्रवास करणारा, त्याच्या नशिबी गैरसोय ही आलेलीच. कधी तांत्रिक कारणांमुळे, तर कधी टायर पंक्चर झाल्याने ‘पीएमपी’च्या (PMP Bus) दिवसाला सुमारे ४० बस रस्त्यातच बंद पडत आहेत. आयुर्मान संपलेल्या बस सेवेत धावत असल्याने ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. मात्र याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना पावसात पायपीट करावी लागत आहे.

Omprakash Bakoria PMP
समृद्धीनंतर 'या' 388 किमी ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गावर मोहोर

‘पीएमपी’च्या (PMPML) सुमारे १६५० बस दररोज पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या क्षेत्रात धावतात. यातून सरासरी १२ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. यातल्या सुमारे ४० विविध मार्गांवरच्या बस बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रस्त्यातच बस बंद पडल्याने वाहतुकीला देखील मोठा अडथळा ठरत आहे. यात ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक आहे. ठेकेदारांच्या २२, तर ‘पीएमपी’च्या मालकीच्या १८ बस बंद पडत आहे. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे.

Omprakash Bakoria PMP
Vande Bharat चे प्रवासी घटल्याने रेल्वे घेणार मोठा निर्णय; लवकरच..

दरम्यानच्या काळात पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी बसच्या देखभाल व दुरुस्तीवर लक्ष केंद्रीत केल्याने ब्रेक डाउनचे प्रमाण कमी झाले होते. पण आता त्याचे प्रमाण पुन्हा वाढत आहे, अशी माहिती ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

Omprakash Bakoria PMP
Nagpur: 'या' देखण्या प्रकल्पाचे राष्ट्रपतींकडून लोकार्पण

‘पीएमपी’च्या ताफ्यातील सुमारे ३५० बसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यांना १२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तर सुमारे २५० बसचे आयुर्मान येत्या मार्च महिन्यात कालावधी संपत आहे. आधीच बसची संख्या कमी आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासन बस सेवेच्या बाहेर न काढताच तशाच सुरू ठेवत आहे. परिणामी बसचे ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. नवीन बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल झाल्यावरच आयुर्मान संपलेल्या बस प्रवासी सेवेतून बाहेर होतील. तोपर्यंत प्रवाशांच्या नशिबी कायम राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com