लक्ष आहे आमचं! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर नियम मोडणारांना दणका

Pune-Satara Highway
Pune-Satara HighwayTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune - Mumbai Expressway) बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने सहा पथक तैनात करण्यात आले आहे. त्याद्वारे विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. मात्र, रोजची वाहतूक लक्षात घेता कारवाईचे प्रमाण कमी आहे. द्रुतगती मार्गावर सर्वांत जास्त कारवाई लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर झाली आहे. त्यानंतर सीटबेल्ट न लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Pune-Satara Highway
पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

...अशी आहे मोहीम
- परिवहन विभागाच्यावतीने २२ डिसेंबरपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर व जुन्या महामार्गावर कारवाई सुरू
- यासाठी पुणे, पिंपरी, ठाणे, पनवेल, मुंबई आदी आरटीओचे पथक २४ तास कार्यरत
- इंटरसेप्टर वाहनाच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी कारवाई
- १ ते २५ डिसेंबरमध्ये सर्वाधिक कारवाई लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर
- लेन कटिंगच्या ८९६ वाहनांवर कारवाई
- विना सीट बेल्ट वाहन चालविणाऱ्या ८८८ वाहनांवर कारवाई
- महामार्ग पोलिसाकडून देखील कारवाई सुरूच आहे.

Pune-Satara Highway
मोठी बातमी! पुण्यातून 'या' मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस?

रोजची किमान ४० हजार वाहने
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रोज किमान ४० हजार वाहनांची वाहतूक होते. हा आकडा सुट्टीच्या दिवशी अथवा शनिवार व रविवारी अधिक असतो. आठवड्याच्या शेवटी वा सुट्टीच्या दिवशी हा आकडा ७० हजारच्या घरात जातो. वाहनाच्या संख्येच्या तुलनेने एक टक्के वाहनांवर देखील रोजची कारवाई झालेली नाही.

Pune-Satara Highway
नार-पार-गिरणा नदी जोडला 2 महिन्यात मान्यता; 58000 हेक्टरला लाभ

१ ते २५ डिसेंबर दरम्यान कारवाई
- ओव्हरस्पीड : ६६०
- लेन कटिंग : ८९६
- विना सीटबेल्ट : ८८८
- अवैध पार्किंग : ४२७
- एकूण ः २८७१

Pune-Satara Highway
27 एकरवर होणार कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास; 8238 रहिवाशांना घरे

आरटीओच्या विविध पथकांकडून द्रुतगती मार्गावर कारवाई सुरू आहे. २४ तास आम्ही कारवाई करीत आहोत. लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर सर्वात जास्त कारवाई करण्यात आली.
- भारत कलासकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com