पुणे शहरासह जिल्ह्यात 39 ब्लॅकस्पॉट; गेल्या 3 वर्षांत अडीचशेच्यावर नागरिकांचा गेला जीव

Accident
AccidentTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहर व जिल्ह्यात ३९ अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आढळले असून, या भागात गेल्या तीन वर्षांत सुमारे साडेचारशे गंभीर अपघात झाले आहेत. यात तब्बल अडीचशेच्या वर नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गांवर झालेले आहेत. पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर तीन वर्षांत सर्वाधिक आहेत, तर पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर व पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रत्येकी चार अपघात झाले आहेत. महामार्गांवरील अपघातांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कामे सुरू करण्याची गरज आहे.

Accident
Pune : पुणे महापालिकेने पीएमआरडीएला का दिला दणका? 'ती' चूक भोवली

इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार रस्त्यांचे परीक्षण केल्यानंतर २०२० ते २०२२ या तीन वर्षांतील धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. राज्यातील एकूण रस्त्यांची लांबी सहा लाख किलोमीटरहून अधिक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या १७ हजार ७५७ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचा यात समावेश आहे. राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते आणि शहरांच्या रस्त्यांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्ग सर्वांत कमी आहेत. मात्र ब्लॅक स्पॉटमध्ये राष्ट्रीय महामार्गांचा समावेश जास्त असून सुमारे ९८ टक्के अपघात झालेले आहेत.

अपघात प्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) व झालेले अपघात

चिंबळी फाटा - ७

कुरुळी फाटा-१३

चाकण तळेगाव चौक-२९

बोराडे वस्ती-५

सोमाटणे फाटा-६

पुनावळे-९

वाकड पूल-२१

बावधन - २८

साबळेवाडी - ५

खौंबरे - ७

कात्रज चौक - १०

दरी पूल - ९

नवा कात्रज बोगदा - १०

टाटा गार्ड रूम- ८

खराडी बायपास चौक - १८

कात्रज जकात नाका - १०

५०९ चौक - ८

आयबीएम कंपनीसमोर, सासवड रस्ता - ८

रविसदन १५ नंबर - १९

कदमवाक वस्ती - ८

लोणी स्थानक चौक - ७

थेऊर फाटा - ७

माई मंगेशकर हॉस्पिटल - १२

मुठा नदी - ७

डुक्कर खिंड - १०

मुंढवा नदी पूल - ६

सेल्फी पॉइंट नऱ्हे - १३

पालखी विसावा वडकी - २४

रिलायन्स मार्ट चौक - ९

विमाननगर चौक - १०

नवले पूल - ३३

सभापती कॉर्नर नारायणगाव - ८

१४ नंबर कांदळी - ११

वडगाव फाटा - ११

कन्हे फाटा - ८

ढमाले मळा - ७

कोलवडी - ५

पिंपरे खुर्द -८

पिंपरे खुर्द - ९

Accident
Pune APMC : पुणे बाजार समिती संचालकांकडून टेंडर प्रक्रियाच बायपास! 'त्या' ठेकेदाराला मुदतवाढ का?

‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे काय?

एकाच ठिकाणी किमान ५०० मीटरच्या अंतरात तीन वर्षांत पाच अपघात झाले असतील; अथवा अपघातात १० व्यक्तींचा मृत्यू झाला असेल, तर त्या ठिकाणाला ‘अपघात प्रवण क्षेत्र’ अथवा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हटले जाते.

तात्पुरत्या उपाययोजना

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कामे करण्यास सुरुवात केली आहे. यात रस्त्यांवर रम्बलर स्ट्रीप, ब्लींकर, वेग मर्यादेचे फलक, हजार्ड मार्कर बोर्ड, तसेच काही ठिकाणी थर्मोप्लॅस्टिक पेंटिंग करण्यात आले आहे.

चाकण-तळेगाव चौकात ११ जणांचा मृत्यू

चाकण-तळेगाव चौकात या तीन वर्षांत २९ अपघात झाले असून, त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. नवले पुलाजवळही अपघात होऊ नयेत, म्हणून लेन मार्किंगसह अन्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अपघातांची स्थिती

- एकूण अपघात : ४४३

- मृतांची संख्या : २५६

- सर्वाधिक अपघात झालेला महामार्ग : क्रमांक ४

झालेले सर्वाधिक अपघात : १०

- पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर व पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग - प्रत्येकी ४

- पुणे शहर व जिल्‍ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) : ३९

रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी कामे सुरू केली आहेत. ज्या ठिकाणी तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे, तेथे कामे सुरू केली आहेत. ज्या कामांना वेळ व निधीची आवश्यकता आहे, अशा कामांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

- बप्पा बहिर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (मंडळ), पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com