Ajit Pawar: ...तर पुणे मेट्रोला दणका देण्यास मागे पुढे पाहणार नाही!

Ajit Pawar
Ajit PawarTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे मेट्रो रेल कंपनीने गणेशखिंड रस्त्यांसह इतर रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी दिला.

Ajit Pawar
MSRTC: एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जमिनींबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता...

मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पाचा पवार यांनी सोमवारी आढावा घेतला. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पोलिस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रोचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

Ajit Pawar
Mumbai : 30 एकरात साकारणार उच्च न्यायालयाचे नवे संकुल; राज्याचा 'महत्त्वपूर्ण प्रकल्प' म्हणून...

मेट्रोच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन पवार म्हणाले, ‘‘मेट्रोच्या कामांमुळे रस्ते, ड्रेनेजलाइन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाइनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल’’.

बाणेर रॅम्प व पाषाण रॅम्पची कामे गतीने होण्यासाठी पोलिस विभागाने मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी. या काळात वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com