Ajit Pawar : पुण्यासाठी अजितदादांचा निर्णयाचा धडाका; Ring Road बाबत घेतला मोठा निर्णय...

Ajit PAwar
Ajit PAwarTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने 'एक ट्रीलियन' डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी 'मित्रा'ची भूमिका महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) अर्थात ‘मित्रा’च्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विशेष सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेतला.

Ajit PAwar
Pune : रस्त्यातील खड्डे बुजवलेच नाहीत; पुणे महापालिकेची उच्च न्यायालयाकडून खरडपट्टी

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी, उद्योग, अर्थ, व्यापार, उत्पादन, 'आयटी' क्षेत्राच्या विकासावर भर देण्याच्या तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने 'मित्रा'चे कामकाज प्रभावी, गतिमान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. अंतिम टप्प्यात असलेले राज्यातील ८९ सिंचन प्रकल्प, जिल्हा विकासाच्या योजना, नागरी पाणी पुरवठ्याचे, मलनिस्सारण प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात यावेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले.

Ajit PAwar
Nagpur : धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेना पाणी

राज्याचे ग्रोथ सेंटर असलेल्या पुण्याच्या विकासासाठी महत्वाच्या रिंगरोडसह उन्नत रस्त्याचे काम 'एनएचएआय' आणि 'मित्रा'च्या समन्वय, सहकार्याने मार्गी लावण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीला 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, अपर मुख्य सचिव दिपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com