फडणवीसांच्या हस्ते उद्धाटन झालेल्या 'त्या' योजनेबाबत मोठा निर्णय

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

पुणे (Pune) : म्हाळुंगे-माण नगर रचना पहिल्या हायटेक सिटीची (Hightech City) योजना खासगी भागीदारी तत्त्वावर (PPP) राबविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून, पीएमआरडीए स्वतः ही योजना राबविणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामांना सुरवात करण्यात आली असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या टप्प्यात रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून, चार रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित कामांसाठीची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती कामेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

Devendra Fadnavis
'या' कारणामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची पुन्हा रखडपट्टी

पीएमआरडीएकडून चार वर्षांपूर्वी म्हाळुंगे-माण येथील २५० एकर जागेवर टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले होते. या योजनेचा आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. २०१८ मध्ये राज्य सरकारकडून म्हाळुंगे-माण हाय टेक सिटीच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली होती. त्यानंतर ही टीपी स्कीम राबविण्याचे काम एल ॲण्ड टी कंपनीला देण्यात आले होते. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळात या कंपनीकडून कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे या कंपनीकडून हे काम काढून घेण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला.

Devendra Fadnavis
परप्रांतीय जनावरे खरेदीच्या अटीने कंत्राटदार अडचणीत

दरम्यान, मुळा आणि मुठा नदीची पूररेषा जलसंपदा विभागाकडून निश्‍चित करून देण्यात आल्यामुळे पीएमआरडीएने हाती घेतलेल्या टीपी स्कीम योजनेच्या क्षेत्रफळात बदल झाला. त्यामुळे या बदललेल्या क्षेत्रफळाची दखल घेऊन पीएमआरडीएला पुन्हा एकदा या नगर रचना योजनेचा नकाशे तयार करून प्रसिद्ध करावे लागणार आहेत.

Devendra Fadnavis
न्यायालयाचा दणका; महापालिका तिजोरीत पडणार 'इतक्या' कोटींचा खड्डा

नेमके काय झाले?
- खासगी भागीदारी तत्त्वावर योजना राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता
- टेंडर प्रक्रिया राबविण्यासाठीची आवश्‍यक ती तयारी पीएमआरडीएकडून सुरू होती
- खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणारी ही राज्यातील पहिली टीपी स्कीम ठरणार होती
- परंतु प्राधिकरणाची कार्यकारी समिती आणि प्राधिकरण सभा यांनी ‘पीपीपी’वर ही योजना राबविण्यास नकार दिला
- ही योजना प्राधिकरणाने स्वतः राबवावी, असा निर्णय घेण्यात आला
- त्या दृष्टीने पीएमआरडीएने या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय
- पहिल्या टप्प्यात रस्त्यांची कामे करण्यात येणार
- त्यानंतर योजनेतून पीएमआरडीएच्या ताब्यात आलेल्या जागांना सीमाभिंत घालणे, आरक्षणाच्या जागा ताब्यात घेणे आदी प्रक्रिया करण्यात येणार

Devendra Fadnavis
पश्चिम रेल्वेचं पुढचं पाऊल! 'या' कामात 6 महिन्यांत 150 कोटीची कमाई

म्हाळुंगे-माण टीपी स्कीम योजनेची अंमलबजावणी पीएमआरडीएच्या स्तरावर सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी चार रस्त्यांची कामे देखील सुरू झाली आहेत. उर्वरित कामांसाठीची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती कामेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा नगर रचना योजना समन्वयक, पीएमआरडीए

Devendra Fadnavis
खड्डे बुजवण्यासाठी बीएमसीचे टेस्टिंग; 'या' तंत्रज्ञानाचा वापर

गेल्या चार ते पाच वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. त्यांची अंमलबजावणी मात्र धिम्या गतीने सुरू आहे. योजनेच्या कामाला गती मिळाली पाहिजे. पीएमआरडीएने तातडीने ही योजना पूर्ण करावी.
- सुनील चांदेरे, म्हाळुंगे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com