नगरला जोडणाऱ्या 'त्या' रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणासाठी 320 कोटींचे टेंडर

MMRDA
MMRDATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : शहाड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम विधानसभा निवडणुकीनंतर सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३२० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

MMRDA
Mumbai Metro 11 : 'ही' कंपनी करणार ग्रीन लाईन मेट्रोच्या भू-तांत्रिक माती परीक्षणाचे काम

कल्याण - उल्हासनगरसह अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून अहिल्यानगर आणि परिसराला जोडणारा शहाड रेल्वे उड्डाणपूल महत्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी 30 मीटर असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील 36 मीटर आहे. या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होत असते. कधी वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरूस्ती हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने कोंडी होत असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी होती.

MMRDA
Pune Airport : पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना उद्या मिळणार गुड न्यूज

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची आग्रही मागणी केली होती. या कामासाठी निधीही मंजूर करून देण्यात आला होता. आचारसंहितेआधी एमएमआरडीएने या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हे काम सुरु होण्याची शक्यता आहे. वाहनांची गर्दी आणि वाहतूककोंडीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपूल चार पदरी विकसित करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, या प्रकल्पाव्यतिरिक्त कल्याण ते विठ्ठलवाडी असा नवीन पूल बांधणार असून, जो जुना पुणे लिंक रोड, कल्याण-बदलापूर महामार्ग आणि कल्याण-अहिल्यानगर महामार्गाला जोडेल. हा पूल कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत रेल्वेमार्ग ओलांडून कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या २.५ किमी अंतरासाठी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com