Solapur : बनावट बांधकाम परवाने देऊन कोणी केली महापालिकेची फसवणूक?

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal CorporationTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : बनावट बांधकाम परवाने देऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur Municipal Corporation
Pune : चाकण - तळेगाव मार्गावरील कोंडी फुटेना; पोलिसांची दमछाक, 5 वर्षांपासून...

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ पर्यंतच्या दरम्यान महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात घडली आहे. या प्रकरणी नीलकंठ शिवानंद मठपती (उप अभियंता, सोलापूर महापालिका) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या फिर्यादीवरून झाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी (रा. ए स्केअर डिलक्स अपार्टमेंट, बसवेश्वर नगर), श्रीकांत बसण्णा खानापुरे, (रा. रेल्वे स्टेशन जवळ), आनंद वसंत क्षिरसागर (रा. सुंदरम नगर, विजापूर रोड), शिवशंकर बसवंत घाटे (रा. रेवण सिध्देश्वर नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur Municipal Corporation
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मिशन मोडवर; दुसऱ्या धावपट्टीच्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची चाचणी लवकरच

सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभागातील सशंयित आरोपींनी संगनमत करून महापालिकेची व अर्जदारांची जाणीवपूर्वक त्यांच्या फायद्यासाठी फसवणूक केली व बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार त्यांना नसताना देखील कागदपत्रे तयार करून अर्जदारांची व महापालिकेची फसवणूक केली आहे.

खोटे व बनावट बांधकाम परवाने देताना मंजूर केलेल्या आवक रजिस्टरवर अधिकृत बांधकाम परवाना क्रं. १ ते ९६ संदर्भातील मंजूर दस्त जाणीवपूर्वक नाश अथवा त्याची विल्हेवाट किंवा स्थलांतरित केली आहे. महापालिकेकडे केवळ कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून महापालिकेची दोन लाख ४२ हजार ४०८ रुपयांचे नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे तपास करीत आहेत.

Solapur Municipal Corporation
Mumbai-Goa महामार्गावरील ‘या’ टप्प्याची साडेसाती कधी संपणार? 430 कोटींचे टेंडर मंजूर होऊनही रस्त्याची चाळणच

किती जणांना दिले बनावट परवाने?

महापालिकेकडून बांधकाम परवाना घेताना विलंब लागतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन परवानगी संबंधीची माहिती असलेल्या चौघांनी तक्रारदाराला खोटे व बनावट बांधकाम परवाने दिले.

बांधकामाच्या जागेचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही त्याचा त्या चौघांनी वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी किती जणांना अशाप्रकारचे दाखले दिले आहेत, याची तपासणी महापालिकेकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com