Solapur : 170 MLD पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने काय केलीय तयारी?

solapur, water
solapur, waterTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर शहरासाठी मिळणारे १७० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाकणी येथे ६६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण उभारण्यात येत आहे. यासाठी वनविभागाकडे महापालिकेने ६ हेक्टर जमिनीची मागणी केली आहे. प्राथमिक परवानगीवर कामाचे आदेश देण्यात आले आहे.

solapur, water
Good News : पुणेकरांची दिवाळी आणखी होणार गोड! आली 'ती' बातमी...

उजनीतून जलवाहिनीद्वारे १०० एमएलडी पाणी उपलब्ध होते. त्यातील १५ एमएलडी पाणी हे एमआयडीसी चिंचोळीला देण्यात येते. उर्वरित ८५ एमएलडी पाण्यावर पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केले जाते.

सध्याचे जलशुद्धीकरण केंद्र हे ८० एमएलडी क्षमतेचे आहे. आता समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर उजनीवाटे जलवाहिनीद्वारे १७० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची गरज आहे.

नगरोत्थान योजनेतून या कामासाठीची १८ कोटींची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मक्तेदाराला कामाचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पूर्वी अस्तित्वात असलेली ८० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र हे वनविभागाच्या जागेवर आहे आणि नव्याने बांधण्यात येणारे केंद्र देखील वनविभागाच्या जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले ६ हेक्टर जागेची मागणी महापालिकेने वनविभागाकडे केली आहे. त्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविले आहे.

solapur, water
Mumbai : राज्यातील 3 लाख कंत्राटदार का झाले आक्रमक?

पाकणीच्या जागेचा पर्याय म्हणून मंगळवेढा येथील जागा वनविभागाला देण्यात आली आहे. अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक मंजुरीवर जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये शहराला १७० एमएलडी पाणी उपलब्ध झाल्यास टाकळी येथे नदीवाटे येणाऱ्या पाण्याचा उपसा बंद करून सोरेगाव येथील ११० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये हे अतिरिक्त ९० एमएलडी पाणी वळविण्यात येणार आहे.

सोरेगाव येथे पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाईल. पाकणी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यास दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या नव्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्यावर प्रक्रिया होण्यास सुरवात होणार आहे.

solapur, water
Mumbai : रेक्लेमेशनद्वारे समुद्रात भराव टाकून जागा वाढवली जात आहे का? काय म्हणाले कोर्ट?

पाकणी येथे ६६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरवात होणार आहे. वनविभागाच्या जागेचा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर मार्गी लागला आहे. मंगळवेढ्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. जागेविषयीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणे सुरू आहे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com