सोलापुरात ३२ वर्षांनंतर तयार केला आराखडा पण 2 वर्षांपासून सरकारकडे

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal CorporationTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : पावसाळ्यातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तब्बल ३२ वर्षांनंतर शहरातील नाले ट्रेनिंग करण्यासाठी एकूण ५१ नाल्यांचा ८२ किलोमीटर लांबीचा विकास आराखडा तयार केला. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून पहिल्या टप्प्यातील ९५.४७ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे धूळखात पडून असल्याने पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा शून्य परिणाम दिसून येत आहे.

Solapur Municipal Corporation
मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प गुंडाळला? आता या मार्गावर होणार...

तब्बल ३२ वर्षांनंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील ५१ नाल्यांच्या ८१ किलोमीटर ट्रेनिंगकरिता २०१४-१५ मध्ये २०६ कोटींचा विकास आराखडा तयार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने याकरिता शासनाकडे सुवर्णजयंती महाअभियान योजनेंतर्गत नगरोत्थानमधून निधीची मागणी करण्यात आली. मात्र, या योजनेत १०० कोटींची आतील कामे करण्यात येणार असल्याने या ५१ नाल्यांची तीन फेजमध्ये विभागणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील ३० नाल्यांकरिता ९५.४७ कोटींचा विकास आराखडा तयार करून २०१६ मध्ये शासनाकडे प्रस्ताव दाखल केला. त्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी काढत त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला कळविण्यात आले. या संपूर्ण त्रुटींची पूर्तता करून महापालिका नगरअभियंता विभागाने २०१८ मध्ये फेरप्रस्ताव सादर केला. गेली दोन वर्षे नाल्यांचा विषय शासनाकडे धूळखात पडून आहे. या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास पावसाळ्यातील समस्यांचे निकारण होण्यास मदत होणार आहे. शहरातील नाले तुंबणे, रिमझिम पावसातच पाणी रस्त्यावर येणे, नाल्याच्या बफर झोनमध्ये झालेले अतिक्रमण, नैसर्गिक नाले बुजवून झालेले प्लॉटिंग आदींमुळे महापालिका पावसाळ्यापूर्वी करत असलेल्या नियोजनाचा शून्य परिणाम शहरात दिसून येतो. एक-दोन मोठ्या पावसांतच हजारो लोकांच्या घरात पाणी शिरते. ठोस उपाययोजनांसाठी महापालिका शासनाकडे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावाकडे बोट दाखविण्याचे काम करत आहे.

Solapur Municipal Corporation
मुंबई मेट्रो-3 : 'या' तारखेला धावणार पहिली प्रोटोटाइप मेट्रो

सरकारने काढल्या ‘या’ त्रुटी...

- सरकारकडून ७० टक्के निधी मिळणार, त्यात महापालिकेला ३० टक्के रक्कम खर्च करावी लागणार. या ३० टक्के रकमेसंबंधी महापालिकेचा आर्थिक आराखडा

- नाल्यांचा कब्जा महापालिकेचा असल्याचे प्रमाणपत्र

- शहरातील पावसाचे प्रमाण

- नाल्यांच्या परिसरातील जमिनीचा प्रकार

जुन्या डीपीआरमधील नाले

- १९८८ च्या डीपीआरनुसार किनारा हॉटेल, अक्कलकोट रोड लक्ष्मी मंदिर, हैदराबाद रोडवरील खान चाचा हॉटेल, शेळगी गावठाण, देगाव, विजापूर नाका इथंपर्यंतच्या परिसरातील मोठ्या नाल्यांचा समावेश.

जुन्यासह नवीन ५१ नाले

- मजरेवाडी, होटगी रोडवर क्रॉसिंग मुलतानी बेकरी, विजयपूर रोड नर्मदा हाउसिंग सोसायटी ते सिद्धेश्‍वर वनविहार, नीलमनगर, शांतीनगर, अक्कलकोट रोड परिसर, कुमठे गाव ते जयहिंद चौक, एसपीएम कॉलेज, लिमयेवाडी ते पटवर्धन चाळ, अभिषेकनगर, पोगूल विहार, सुनीलनगर ते नवलेनगर यासह जुन्या नाल्यांचा समावेश आहे.

असा आहे नाल्यांची वहिवाट

- रूपाभवानी मंदिर, जुना पूना नाका, कारंबा नाका, अवंतीनगर या परिसरातून जाऊन १४ कमानीला जोडते. तर कुमठा नाका दोन नंबर बसस्टँड, सदर बझार नाला, कुमार चौक, लोधी गल्ली, लष्कर, संगमेश्‍वर कॉलेज, रेल्वे स्टेशन भाजी मंडई येथून देगाव नाका व मोदी ब्रीज, रामवाडी मार्गे शेळगी नाल्याला जाऊन मिळते.

सध्या जे नाले आहेत ते अनेक ठिकाणी मातीतून वाहतात. त्याच्या दोन्ही बाजूचे कठडे हे अतिशय कमकुवत आहेत. त्यामुळे नाला ट्रेनिंग करणे अत्यावश्यक आहे. त्रुटींची पूर्तता करून शासनाकडे फेरप्रस्तार सादर करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव शासन निधीच्या प्रतीक्षेत आहे.

- संदीप कारंजे, नगर अभियंता

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com