Solapur : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेल्या 'त्या' वास्तूसाठी 1.49 कोटी; टेंडर प्रक्रियाही पूर्ण

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लागलेल्या मंगळवेढा शहरातील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने एक कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj
'शक्तीपीठ'पाठोपाठ 25 हजार कोटींच्या 'त्या' 2 प्रकल्पांनाही ब्रेक! भूसंपादन प्रक्रिया रद्द

छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर दौऱ्याच्या दरम्यान या भुईकोट किल्ल्यात सात दिवस मुक्काम केला होता. मुक्कामामुळे या किल्ल्याला विशेष असे ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे हा किल्ला दुरुस्त करावा, अशी मागणी या भागातील शिवप्रेमींतून केली जात होती. परंतु पुरातत्त्व विभागाकडून याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात होते.

या किल्ल्यामध्ये अनेक पुरातन काळातील मूर्ती असल्यामुळे हा ठेवा भविष्यातील पिढीला प्रेरणादायी आहे. त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे. किल्ल्याचा बुरूज ढासळला व किल्ल्यात असणारे शासकीय कार्यालय व तुरुंगाचे स्थलांतर झाल्यामुळे किल्ल्याची अधिकच दुरवस्था झाली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj
Tendernama Impact: 'भूखंडावर ताव मारा अन् तृप्त व्हा'! लाडक्या मंत्र्यांसाठी सरकारची नवी योजना; संजय राठोड, 'बिल्डरमंत्री' हे लाभार्थी

हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून किल्ल्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार या किल्ल्याची दुरुस्ती करण्यासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, पुणे या कार्यालयाकडून किल्ल्याच्या देखभाल- दुरुस्तीसाठी एक कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून सध्या किल्ल्याचे ढासळलेले बुरूज आणि तटबंदीचे मजबुतीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीला पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Pune : मुख्यमंत्री साहेब, 'ती' जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी काढलेले टेंडर रद्द करणार का?

महादेव विहीर व किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. आमदार समाधान आवताडे यांनी देखील यामध्ये लक्ष घातल्यामुळे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला. यामुळे या परिसराचा ऐतिहासिक ठेवा कायम राहणार आहे.

- प्रतीक किल्लेदार, शहराध्यक्ष, शिवसेना

भुईकोट किल्ला व कृष्ण तलाव सुशोभीकरणासाठी आपण लक्ष देऊन निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्याबाबत विधानसभेत लक्षवेधी लावल्याने या कामासाठी निधी उपलब्ध झाला. आणखी साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध करणार आहे.

- समाधान आवताडे, आमदार, पंढरपूर-मंगळवेढा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com