Solapur : समांतर जलवाहिनीचे 94 किलोमीटरचे काम पूर्ण; हायड्रोलिक टेस्टिंग 45 टक्के पूर्ण

Water pipeline
Water pipelineTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : समांतर जलवाहिनीच्या एकूण ११० किलोमीटरपैकी जलवाहिनी टाकण्याचे ९४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. रखडलेले टेंभुर्णी येथील काम अंतिम टप्प्यात आले असून हायड्रोलिक टेस्टिंग ४५ टक्के पूर्ण झाली आहे.

Water pipeline
पुणेकरांनो यंदा पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत कारण महापालिकेने...

दुहेरी जलवाहिनीचे काम हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीकडून करण्यात येत आहे. ११० किमी पैकी ९४ किमी मार्गावर जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. यावर्षी पाऊसकाळ कमी झाल्याने जॅकवेलचे ३५ बाय ४० बाय १८.५ मीटर खोदाईचे काम अथक प्रयत्नांमुळे व निसर्गाच्या मदतीने एकाच हंगामात शक्य झाले आहे. या जॅकवेलवर एकूण १२ पंप बसवण्यात असून कन्स्ट्रक्शनचे एकूण ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. हायड्रोलिक टेस्टिंगचे काम सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कराराप्रमाणे नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. किंबहुना त्याआधी हे काम पूर्ण करण्याचे शर्तीचे प्रयत्न राहणार असल्याचे व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.

Water pipeline
Mumbai News : मुंबईत दर्जेदार रस्त्यांसाठी महापालिकेचा चक्रव्यूह; काय आहे नवा प्लान? 

टेंभुर्णी परिसरातील जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या नियमित चालू आहे. सध्या १.८ किलोमीटरचे काम राहिले आहे. तेही लवकरच पूर्ण होईल.

- व्यंकटेश चौबे, स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी

पाकणी जलशुद्धीकरणचे पुन्हा टेंडर

पाकणी येथे जलशुद्धीकरण केंद्र (डब्ल्यूटीपी) उभारण्यात येणार आहे. या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा टेंडर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. विविध प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे काम सुरू होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com