सातारा (Satara) : पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात शनिवारी, रविवारी वाहतूक विस्कळित झाली होती. यावेळी वाहने जागेवरच न थांबता अगदी धिम्या गतीने पुढे सरकत होती. खंबाटकी घाट पास करण्यासाठी एका तासाचा अवधी लागत होता.
हा घाट आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत याच गतीने सुरू असल्याने दुपारी एक तास छोटी चारचाकी वाहने बोगद्यामार्गे सोडण्यात आली. यानंतर या वाहतुकीवर नियंत्रण मिळवता आले. वीकएंड जोडून नाताळाची सुटी आल्याने महाबळेश्वर व गोवा तसेच समुद्रकिनारी कोकणाकडे या सलग सुट्यांमुळे पर्यटकांची संख्या सर्वाधिक असल्याने पुणे बाजूकडून येणाऱ्या गाड्यांची संख्या आजही खूप होती. परिणामी, काल शनिवारी आठ तास चार तास हा घाट बंद राहिला.
दरम्यान, रविवारी घाटमाथा व काठमाथ्यावर ट्रक बंद पडला होता. रस्त्याच्या मधोमध हा ट्रक असल्याने वाहनांना पुढे सरकायला अडचणी निर्माण येत होती. हा ट्रक सायंकाळी वाहतूक पोलिस प्रमोद फरांदे व इतर वाहतूक पोलिस यांच्या मदतीने बाजूला करण्यात आला. ही वाहतूक सांयकाळी उशिरा सुरळीत करण्यात आली.