सातारा-कागल रस्त्याचे टेंडर एवढ्या कोटींचे; पुन्हा महिन्याची मुदत

या रस्त्याला एक महिन्याची मुदतवाढ
Road
RoadTendernama
Published on

कोल्हापूर (Kolhapur) : सातारा ते कागल (Satara To Kagal) टप्प्याचे सहापदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India) टेंडर (Tender) सादर करण्यास पुन्हा एक महिन्यांची मुदतवाढ दिली. यापुर्वी ही मुदत २३ नोव्हेंबरपर्यंत होती, पण अचानक टेंडर सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, यासाठी ३ हजार ७३० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे.

Road
'टेंडरनामा' ग्राउंडरिपोर्ट; रस्ता उखडलेला अन् ठेकेदाराचे हात वर

केवळ जमीन संपादनाचे काम रखडल्याने या कामाला सुरुवात झाली नव्हती. हा टप्पा १३२ किलोमीटरचा असून, त्यासाठी सुमारे २५० हेक्टर जमीन संपादनाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले. उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी दोन टप्प्यांत टेंडर मागविण्यात आले. त्यातील एक टेंडर दोन हजार आठ, तर दुसरे टेंडर एक हजार ७१२ कोटींची आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत हे टेंडर सादर करण्याची अंतिम मुदत होती, तर आज हे टेंडर उघडण्यात येणार होते, पण अचानक याला मुदतवाढ दिल्याने या कामासाठी टेंडर कमी आले की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Road
पुणे–सातारा रस्त्यावर रिलायन्सकडून २ हजार कोटींची बेकायदा टोलवसुली

महामार्गाच्या दुतर्फा आणखी पदर तयार करण्यात येणार आहेत. सांगली फाट्यावर पंचगंगेचे पाणी येऊन रस्ता बंद होतो, हे टाळण्यासाठी तेथे महामार्गाला १३ ठिकाणी बॉक्स ठेवण्यात येणार आहेत; तर कागल ते सातारा टप्प्यात नद्यांचे पाणी येते, अशा १६ ठिकाणीही ‘ओपनिंग’ असणार आहेत. महापूर आल्यावर महामार्गावरील वाहतूक कोणत्याही स्थितीत बंद राहणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Road
मुंबईतील 'एक्स्प्रेस वे'वरच्या खड्ड्यांसाठी किती कोटींचे टेंडर?

कोल्हापूरसह सांगली, सातारा अशा तीन जिल्ह्यांतून काम जाणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कामाचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रारंभ झाला आहे. सातारा जिल्ह्यात ५८, कोल्हापूर जिल्ह्यात ४२, तर सांगली जिल्ह्यात ३२ किलोमीटरचे काम होणार आहे. दोन्‍हीही टेंडर ७ ऑक्टोबरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. एका टेंडरसाठीच्या अर्जाची किंमत दोन लाख १० हजार, तर दुसऱ्या अर्जासाठीचे शुल्क एक लाख ८० हजार रुपये आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com