सातारा (Satara) : सातारा, कऱ्हाड, सांगली आणि मिरज येथील विठ्ठल भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) दादर-पंढरपूर गाडीचा व्हाया मिरजमार्गे सातारापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सातारा, सांगली आणि मिरजकरांना मुंबई आणि पंढरपूरसाठी थेट साताऱ्यातून नवी गाडी उपलब्ध झाली आहे.
शिवाय मिरज-पंढरपूर मार्गावरील (Miraj-Pandharpur Route) कवठेमहांकाळ-ढालगाव, जत रोड, सांगोला या प्रमुख तालुक्यातील रेल्वे (Dadar-Pandharpur Express) प्रवासी मुंबईशी जोडले जाणार आहेत. ही गाडी सातारा येथून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून, पंढरपूर येथे रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. मुंबई येथील दादर येथे सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीस सातारा, कोरेगाव, मसूर, कऱ्हाड, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, केम, जेऊर, भिगवण, दौंड, केडगाव, उरुळी, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादर हे थांबे आहेत.
यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मिरज रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील, सोलापूर रेल्वे संघटनेचे संजय पाटील यांनी पाठपुरावा केला होता.