अहमदनगर (Ahmednagar) : अहमदनगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १५ वाळू (sand) साठे (घाट) लिलावासाठी (Auction) सहावेळा टेंडर (Tender) प्रसिद्ध करुनही अवघे दोन वाळू साठ्यांचे लिलाव झाले आहेत. वाळू ठेकेदार हेतूपुरस्सर लिलाव घेत नाहीत. त्यांनी आपसामध्ये वाळूचे लिलाव वाटून चोरटी वाहतूक करीत असल्याचे चित्र यावरून स्पष्ट होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज शाखेमार्फत जिल्ह्यातील वाळू, मुरूम, दगडखाण आदी गौण खनिजाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) वसूल केली जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड, सिना आदी नद्या वाहत आहेत. या नद्यांचे पात्र मोठे असल्याने नदीपात्रामध्ये वाळू मुबलक प्रमाणात वाहून येत आहे. या नदी काठावरील गावातील ग्रामपंचायतीने वाळू लिलाव करावयाचा असल्यास ठराव करून द्यावा लागतो. ज्या ग्रामपंचायती वाळू लिलावाचा ठराव करतात. त्या ग्रामपंचायतीला वाळू लिलावाच्या रक्कमेपैकी २५ टक्के निधी ग्रामपंचायत विकासासाठी दिला जातो. ग्रामपंचायतीचा हा ठराव स्थानिक तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज शाखेला प्राप्त होतो. गौण खनिज शाखेचे अधिकारी, भूजल सर्वेक्षण कार्यालय आणि शासकीत तंत्रनिकेतन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक ज्या गावांचा ठराव आला आहे. त्या गावात जाऊन वाळू लिलावाची पाहणी करतात. नदीपात्रातील वाळूची खोली मोजली जाते. संबंधित जागेचे मोजमाप करून वाळूसाठा (ब्रास) किती आहे, हे ठरविले जाते.
जिल्हा प्रशासनाने २०२१ या वर्षांसाठी जिल्ह्यातील १५ वाळूसाठे (घाट) लिलाव जाहिर केले होते. वाळूसाठा असलेल्या गावाचे नाव, साठा (ब्रास) आणि किंमत (लिलावाची २५ टक्के इसारा रक्कम) याप्रमाणेः श्रीरामपूर : वांगी खुर्द (प्रवरा)- ब्रास १६५४, किंमत ६५ लाख ३३ हजार ३०० (१६ लाख ३३ हजार ३२५), नायगाव (गोदावरी)- ब्रास ५५५५, किंमत दोन कोटी, १९ लाख ४२ हजार २५० (५४ लाख ८५ हजार ५६३), मातुलठाण-क्रमांक-एक (गोदावरी)- ब्रास ९२९३,तीन कोटी, ६७ लाख, सात हजार ३५० (९१ लाख ७६ हजार ८३८). मातुलठाण-क्रमांक-दोन (गोदावरी)- ब्रास ५७८८, दोन कोटी २८ लाख ६२ हजार ६०० (५७ लाख १५ हजार ६५०), मातुलठाण क्रमांक-तीन (गोदावरी)-ब्रास ४२६०, एक कोटी ७२ लाख २२ हजार (४३ लाख पाच हजार ५००), कोपरगाव : कोकमठाण व सवंत्सर (गोदावरी)- ब्रास २१२०, ८३ लाख ७४ हजार (२० लाख ९३ हजार ५००), सोनारी व कोळगावथडी (गोदावरी)- ब्रास ४०५५, एक कोटी ६० लाख १७ हजार २५० (४० लाख चार हजार ३१३), जेऊर कुंभारी व जेऊर पाटोदा (गोदावरी)- ब्रास १९४८, ७६ लाख ९४ हजार ६०० (१९ लाख २३ हजार ६५०), राहुरी : राहुरी खुर्द (मुळा)- ब्रास २३७५, ९३ लाख ८१ हजार २५० (२३ लाख ४५ हजार३१२), पिंप्री वळण, चंडकापूर (मुळा), ब्रास २३०७, ९१ लाख १२ हजार ६५० (२३ लाख ४५ हजार ३१२), वळण (मुळा)- ब्रास ६८९३, दोन कोटी ७२ लाख २७ हजार ३५० (६८लाख, सहा हजार ८३७), रामपूर (प्रवरा), ब्रास २५०४, ९८ लाख ९० हजार ८०० (२४ लाख ७२ हजार ७००), सात्रळ (प्रवरा)- ब्रास ३७१०, एक कोटी ४६ लाख ५४ हजार ५०० (३६ लाख ६३ हजार ६२५), राहाता : पुणतांबा (गोदावरी)- ब्रास ५००९, एक कोटी ९७ लाख ८५ हजार ५५० (४९ लाख ४६ हजार ३८७), रस्तापूर (गोदावरी)- ब्रास ३३९२, एक कोटी ३३ लाख ९८ हजार ४०० (३३लाख ४९ हजार ६००)
सहा वेळा टेंडर प्रसिद्ध करून दोन साठ्यांचा लिलाव
जिल्हा प्रशासनाच्या गौण खनिज विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १५ वाळू लिलावासाठी ४ जानेवारी २०२१ ला पहिल्यांदा टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी १५ दिवसांनी पुन्हा असे सहा वेळा टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख दैनिकांसह शेजारील जिल्ह्यातील दैनिकातही वाळू लिलावाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. या टेंडरनंतर मातुलठाण (ता. श्रीरामपूर) येथील क्रमांक तीनचा चार हजार ३६० ब्रास वाळूचा लिलाव झाला. सोनारी व कोळगाव थडी (ता. कोपरगाव) येथील चार हजार ५५ ब्रास वाळूचा लिलाव झाला आहे.
- वसिम सय्यद, जिल्हा गौण खनिज अधिकारी, अहमदनगर