Nagar : जिल्ह्यातील दीड हजार घरांवर सौर यंत्रणा; प्रधानमंत्री सूर्यघर योजना

Solar Panel
Solar PanelTendernama
Published on

अहिल्यानगर (Ahiyanagar) : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत महावितरणच्या पोर्टलवर एकूण अर्ज केलेल्या ग्राहकांमध्ये जिल्ह्यातून सात हजार ७०० ग्राहकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक हजार ४४० ग्राहकांनी ५.०८ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी दिली.

Solar Panel
Mumbai : 2 हजार मुंबईकरांना मिळाले हक्काचे घर! कोणाला लागली म्हाडाची लॉटरी?

महिनाभरात तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते. तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते, तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो.

Solar Panel
Pune : ऊर्जा विभागाने शासकीय कोशागार कार्यालयच केले बायपास! काय आहे प्रकरण?

अनुदान ग्राहकांच्या खात्यावर

वीजग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर तसेच पीएम – सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल ॲपवर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com