Nagar ZP : महिनाभरात CCTV कॅमेरे बसवा अन्यथा मान्यता गेलीच म्हणून समजा!

CCTV
CCTVTendernama
Published on

अहमदनगर (Ahmednagar) : विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये येत्या महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास त्या संबंधित शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिला आहे.

CCTV
पनवेल ते बदलापूर 15 मिनिटांत; वडोदरा ते मुंबई महामार्गावरील 'तो' बोगदा विक्रमी वेळेत पूर्ण

विद्यार्थी सुरक्षेसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. विद्यार्थी सुरक्षेसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची कार्यशाळा आज ऑनलाईन पद्धतीने झाली. या वेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी राजश्री घोडके व मीना शिवगुंडे आदी उपस्थित होते.

येरेकर म्हणाले की, प्रत्येक शाळेची पहिली जबाबदारी ही विद्यार्थी सुरक्षेची आहे. त्यामुळे शाळेत कोणत्याही मुलीवर किंवा मुलावर लैंगिक अत्याचार होऊ नये, यासाठी मुख्याध्यापकांनी विशेष उपाययोजना कराव्यात. यात मुलांना 'गुड टच, बॅड टच' याविषयी माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे.

CCTV
बापरे, शालेय शिक्षण खात्यात बदल्यांचे टेंडर फुटले! कोट्टीच्या कोट्टी उड्डाणे

एक सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये चाईल्ड सेफ्टी आॅडिट करून घ्यावे. तसेच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर मुख्याध्यापकांनी ठराविक वेळेनंतर फुटेज तपासणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची किंवा शाळा व्यवस्थापन समितीची असेल. त्यामुळे मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेजची तपासणी करणे गरजेचे आहे.

या फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्वरीत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याचीही जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे शाळेत काही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहील. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी पाटील यांनी करून सद्यस्थितीची माहिती दिली.

CCTV
Mumbai : गिरणी कामगारांना सरकारने काय दिली Good News? टेंडरही निघाले; वाचा सविस्तर

सखी सावित्री समिती स्थापन करा

जिल्ह्यातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह सखी सावित्री समिती गठीत करुन शाळेतील सुरक्षेवर प्राधान्य द्यावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. शाळेत येणाऱ्या प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, अन्यथा शाळेवर कारवाई करण्यात येईल. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेकडे देण्यात यावी.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे तंतोतत पालन करून शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com