Nagar: बांधकाम कामगार मंडळाच्या 'त्या' धोरणांना का होतोय विरोध?

Worker
WorkerTendernama
Published on

नगर (Nagar) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. मंडळाने चुकीचे धोरण रद्द करावे, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकताच मोर्चा काढला होता. या वेळी रिकामे भांडे वाजवून आक्रोश आंदोलन करण्यात आले.

Worker
Tender Scam: एकाही रुग्णवाहिकेचा पुरवठा न करता ठेकेदारांवर महिना 33 कोटींची दौलतजादा

बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या दिल्याने संपूर्ण रस्ता आंदोलक महिलांनी व्यापला होता.

या आंदोलनात निसार शेख, वैभव सोनवणे, आदेश साळवे, संगीता बोखारे, लक्ष्मी लवटे, दीपाली सरोदे, आसमा शेख, आशा माने, राणी घोडके, मंगल पाखरे, कांतीलाल भिसे, राहुल अडसूळ, रियाजभाई तांबोळी, समीना सय्यद, सुनील जाधव, सुनीता सरोदे, स्वप्नील जाधव, विशाल खराडे, शाहिन शेख, पूनम समुद्र, राहुल अडसूळ, शोभा येडे, मालन पवार, अश्‍विनी वांकडे, साधना साळवे, राणी जाधव आदींसह विविध समाजांतील महिला कामगार सहभागी झाले होते.

Worker
राज्यातील वीजग्राहकांना बसणार मोठा दणका; काय आहे कारण?

लाडकी बहीण योजनेतून महिलांचा फायदा होणार आहे. परंतु, ज्या बांधकाम व इतर कष्टकरी कामगार वर्गातील महिलांना या महागाईच्या काळात दीड हजार रुपयांचा फायदा होणार नाही. हजारो कोटी रुपये कामगार मंडळाकडे असून, तो पैसा नोंदणीत महिला कामगारांना मिळाल्यास त्यांना जीवन जगणे सुसह्य होणार आहे.

भैलुमे म्हणाले की, कष्टकरी महिलांवर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अन्याय करत आहे. पूर्वी कामगारांना जेवण दिले जायचे. मात्र, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने ती योजना बंद करून कामगारांना उपाशी ठेवण्यात आले आहे. कामगार वर्ग उपाशी असल्याने त्यांना रिकामे डबे, ताट वाजवण्याची वेळ आली आहे. शासनाच्या वतीने दिले जाणारे लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नाही. कामगार कल्याणकारी मंडळकडून तालुकास्तरावर उभारण्यात आलेल्या बीओसी सेंटरवर शासकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Worker
PCMC: पिंपळे सौदागरमधील वाहतूक कोंडी फुटणार; पालिकेचा काय आहे प्लॅन?

बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हा मोर्चा मुंबई येथील कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयावर धडकणार आहे. महिला कामगार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या मागण्याचे निवेदन सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वीकारले.

बोनस द्यावा

मंडळाच्या वतीने कामगारांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये बोनस दिला जात होता. परंतु, तीन ते चार वर्षांपासून बोनस बंद करण्यात आला आहे. यावर्षी १० हजार रुपये बोनस देण्यात यावा.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com