MTDC : सरकारने काढले एमटीडीसीच्या खासगीकरणाचे टेंडर; कंत्राटी कर्मचाऱ्यांची उडाली झोप

MTDC
MTDCTendernama
Published on

भोसे (Bhose) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) राज्याच्या विविध भागांतील सुमारे ३० पर्यटक निवासाचे लवकरच खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली असून, महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचे टेंडर (Tender) प्रसिद्ध झाल्याचे वृत्त आहे. ११ महिन्यांच्या कंत्राटी कामगारांना काम संपवण्याबाबतची नोटीसही देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. महाबळेश्वर येथील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करीत या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.

MTDC
Mumbai : उर्वरित महाराष्ट्राला जोडणारा पनवेल नजीकचा 'तो' दुवा विस्तारणार; 770 कोटींची मान्यता

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये अनेक वर्षांपासून विविध भागांतील प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळावर पर्यटक निवास कार्यरत आहेत.

यामध्ये गणपतीपुळे, महाबळेश्वर, तारकर्ली, ताडोबा, शिर्डी, चिखलधारा, कार्ला, भंडारदरा, माळशेज घाट, सिंहगड, नाशिक अशा पर्यटक निवासाचे व इतर काही ठिकाणे मिळून ३० पर्यटक निवासाचे खासगीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

MTDC
नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 हजार 645 कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

पर्यटन महामंडळामध्ये दोन प्रकारचे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. ११ महिन्यांच्या कंत्राटावरील राज्यातील ४७ कर्मचाऱ्यांचा कार्यकाल २० मे २०२४ ते १९ एप्रिल २०२५ असा आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना ११ सप्टेंबरला नोटीस दिली असून, ३० दिवसांनी म्हणजे ११ ऑक्टोबरला त्यांचे कंत्राट रद्द केले जाणार आहे.

७०० कर्मचारी बाहेरील एजन्सीकडून कार्यरत असून, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

MTDC
Pune : 'या' उड्डाणपुलावर अपघातांची मालिका; काय आहे कारण?

महामंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांत भरती झालेली नाही. महामंडळातील नियमित कर्मचारी निवृत्त होत गेले; परंतु त्यांच्या जागेसाठी भरती झाली नाही. त्याबदल्यात कंत्राटी कर्मचारीच घेतले गेले. शासनाने इतर महामंडळामध्ये वारंवार भरती प्रक्रिया राबवली. मात्र, पर्यटन विकास महामंडळाकडे दुर्लक्षच केले गेले आहे.

यामुळे खासगीकरणाचा विरोध म्हणून राज्यातील कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. महाबळेश्वर येथील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून खासगीकरणाचा निषेध केला.

MTDC
Mumbai : 2 हजार मुंबईकरांना मिळाले हक्काचे घर! कोणाला लागली म्हाडाची लॉटरी?

शासनाच्या निर्णयाचा निषेध

महात्मा गांधी यांची जयंती पर्यटकांबरोबर साजरी करतानाही कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. आम्ही गांधीजींच्या शांततेच्या विचाराने पुढे जात शासनाला विरोध करीत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com