नगर जिल्ह्यातील १७ सिंचन योजनांचा सर्व्हे; एवढा निधी मंजूर

Nilwande Dam
Nilwande DamTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यांतील मुळा धरणाच्या नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसासिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून, यासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. १०१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १७ योजनांसाठी एकूण ३,९०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी २ कोटी ३७ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Nilwande Dam
CNG बाबत नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर...

योजनांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच उपसा सिंचना योजनांच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्याबाबतची मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्यामुळेच उपसा सिंचन योजनांची क्षेत्रीय प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शिंदोडी, मांडवे, बिरेवाडी, खरशिंदे, साकुर, वरवंडी, पेमगिरी, शिरापूर, डिग्रस, पारेगाव खु. व बु., तिगाव, काकडवाडी, करुले, कर्हे, निमोन, व सोनोशी या १७ गावातील अवर्षण प्रवण क्षेत्राचा समावेश आहे. या भागात उपसा सिंचन झाल्यास पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १८०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी ९६ लाख ९८ हजार १४१ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या २१०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी १ कोटी ४० लाख ३३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Nilwande Dam
मोठी बातमी! बेस्टचे 3675 कोटींचे 'हे' टेंडर 'ऑलेक्ट्रा'च्या खिशात

सर्वेक्षणानंतर करण्यात येणाऱ्या अहवालामध्ये प्रामुख्याने नलिका प्रणालीचे सखोल संकल्पन केल्यानंतर अहवाल सादर करण्यात येईल. याशिवाय नदीपात्र, नदीकाठ ते जॅक वेल तसेच संपूर्ण नलिक वितरणाचे तलांक नकाशावर दर्शविण्यात येतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com