Khambatki Ghat
Khambatki GhatTendernama

Pune-Bengaluru Highway : खंबाटकीतील सहापदरी बोगदा अन् उड्डाणपुलाबाबत गडकरींनी दिली गुड न्यूज

Published on

पुणे (Pune) : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम प्रगतीपथावर असून हे काम यावर्षी डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली. तर याच मार्गावर कराड शहराजवळील साडेतीन किलोमीटर अतंराचा सहापदरी उड्डाणपूलाचे 27 टक्के काम पूर्ण झाले असून, पूल पूर्णत्वाचा मूहूर्तही सांगितला.

Khambatki Ghat
'त्या' प्रकल्पांचा पर्यटन डीपीआर तातडीने सादर करा; अजित पवारांचे आदेश

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 च्या सहापदरीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच महामार्गावरील विविध सोयीसुविधांबाबत सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. श्रीनिवास पाटील यांनी रस्ते विकास मंत्रालयास अतारांकित प्रश्न विचारला. यामध्ये खा.पाटील म्हटले, पुणे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी कामाची सद्यस्थिती काय असून शेंद्रे-कागल विभाग आणि शेंद्रे-पुणे विभाग दरम्यान किती काम पूर्ण झाले आहे. तसेच कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे बांधकाम सध्या  सुरू असून त्या कामाची गती वाढवावी, अशी मागणी संसदेत केली. नागठाणे, पारगाव आणि वेळे येथील उड्डाणालाच्या काम, शिरवळ येथील ओव्हर ब्रिज, उंब्रज येथील उड्डाणपूल, खंबाटकी घाटाजवळील एस- टर्नच्या ठिकाणचे बांधकामे लवकर पूर्ण करून महामार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खा. पाटील यांनी केली.

Khambatki Ghat
Pune : कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत सहकार न्यायालयाचा मोठा निर्णय!

कराडचा सहापदरी उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार

मंत्री नितीन गडकरी यांनी खा. पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर दिले असून ते म्हणाले, कराड येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून त्याचे 27% काम पूर्ण झाले आहे. तर ऑक्टोबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नागठाणे येथील अंडरपासचे काम हाती घेण्यात आले आहे. वेळे गावात उड्डाणपूल होणार आहे. खंबाटकी घाटातील सहापदरी दुहेरी बोगद्याचे बांधकाम येत्या डिसेंबर पर्यंत होणार आहे. तर पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपुलाच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी डीपीआर करण्यात आल्याचे गडकरी यानी उत्तरामध्ये म्हंटले आहे. याशिवाय उंब्रज येथील पारदर्शक उड्डाणपूलासाठी खा.श्रीनिवास पाटील यानी ना.गडकरी यांना समक्ष भेटून त्याच्या पूर्णतः साठी विनंती केली आहे.

वाहनचालक-प्रवाशी वैतागले

सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील सहापदरी बोगद्याचे आणि सातारा- कोल्हापूर महामार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील कामामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काम सुरू होताना ठेकेदार कंपनीने वाहतूक कोंडीविषयी सुचविलेल्या उपाययोजना करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. वारंवारं वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशी वैतागले आहेत. त्यामुळे या मार्गावरील काम लवकरात लवकर करण्याची मागणी होत असून वर्षअखेरीला या कटकटीतून सुटका होईल, असे मंत्री नितीन गडकरींनी संसदेत म्हटले आहे.

Tendernama
www.tendernama.com