Maharashtra : स्वस्तातील वाळू पावसाळ्यानंतरच मिळणार कारण...

नदीतील पाण्यामुळे सर्वेक्षण नाही; पावसाळ्यात वाळू उपशावर निर्बंध
Sand Mining
Sand MiningTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून ६०० रुपयांत एक ब्रास वाळू देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. पण, उन्हाळी आवर्तनामुळे नद्यांमधील पाण्यामुळे वाळू ठिकाणांच्या सर्वेक्षणाला अडथळे आले. वाळू उत्खनन व वाळू डेपोच्या टेंडर प्रक्रियांसाठी मे उजाडणार असून तत्पूर्वी, वाळू उपशाला राज्य पर्यावरण समितीची मंजुरी लागेल. दुसरीकडे १० जून ते ३० सप्टेंबर या काळात वाळू उपसा करण्यावर ‘एनजीटी’चे निर्बंध आहेत. त्यामुळे स्वस्तातील वाळू आता पावसाळ्यानंतरच मिळणार आहे.

Sand Mining
EXCLUSIVE: महानिर्मितीत लाखोंची उधळपट्टी; बैठकीच्या नावाखाली चुना

नागरिकांना स्वस्त दरात वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी १ मेपासून होईल, अशी घोषणा झाली. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाचे निकष व राज्याच्या वाळू धोरणातील अटी, टप्प्यांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतरच वाळू मिळणार आहे. त्यातही वाहतुकीचा खर्च लाभार्थीलाच करावा लागेल. ‘आरटीओ’च्या माध्यमातून ट्रॅक्टर, ट्रकसाठी किलोमीटरनिहाय वाहतूक दर किती असावा, हे निश्चित होईल.

Sand Mining
Good News : राज्यात 'या' 40 ठिकाणी अतिरिक्त ई-चार्जिंग स्टेशन

तत्पूर्वी, नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमली जाईल. प्रत्येक तालुक्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, आरटीओ, भूजल व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि भू-विज्ञान व खनिकर्म विभागाचे अधिकारी आहेत. वाळूचे ठिकाण निश्चित केल्यावर संबंधित ग्रामसभेचा ठराव लागतो. ग्रामसभेने ठराव नाकारल्यास प्रांताधिकारी त्यावर निर्णय घेतील, असे निकष आहेत.

Sand Mining
Navi Mumbai : मेट्रोची एका तपानंतर सुद्धा रखडपट्टी; ठेकेदार मोकाट

वाळूसंदर्भात ठळक बाबी...

एका कुटुंबाला मर्यादा : १० ते १२ ब्रास

अर्ज करण्याची प्रक्रिया : ‘महाखनिज’ संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल

वाळू मिळण्याची मुदत : १५ दिवस

एक ब्रासचा दर : ६०० रुपये

वाहतूक खर्च : स्वत: अर्जदारालाच करावा लागेल.

सहा टप्पे पार केल्यावरच वाळूचा पुरवठा

सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर), चळे (ता. पंढरपूर) व खानापूर (ता. अक्कलकोट) येथील वाळू ठिकाणांचे सर्वेक्षण पाण्यामुळे होऊ शकले नाही. नदीतील पाणी कमी होईपर्यंत सर्वेक्षण करता येणार नाही. सर्वेक्षणानंतर वाळू उपसा करण्यासाठी राज्य पर्यावरण समितीची परवानगी बंधनकारक आहे. तो प्रस्ताव १५ दिवसांत पाठविला जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून वाळू उत्खनन करणे, वाळू डेपोसाठी सरकारी किंवा खासगी जागा घेणे, वाहतुकीचे दर निश्चित करणे, ग्रामसभा बोलावून ठराव करणे, असे टप्पे पार करावे लागणार आहेत. त्यामुळे १ मेपासून नव्हे तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच स्वस्तातील वाळू उपलब्ध होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com