मुंबई (Mumbai) : बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित सरकारी निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. आमदार अनिल बाबर यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
वर्षा निवासस्थानी आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी सरकारी निर्णयाची प्रत मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना दिली. दरम्यान, टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही शिंदे यांनी आमदार बाबर यांना सांगितले.
दुष्काळी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर पाठपुरावा करीत करीत आहेत. टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.