मोठी घोषणा! आचारसंहितेआधी कर्जत जामखेडसाठी एमआयडीसी जाहीर

MIDC
MIDCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. कर्जत जामखेडसाठी एमआयडीसीची घोषणा करण्यात आली आहे.

MIDC
Mumbai : ठाणे-बोरीवली सुसाट! महायुती सरकारचा जाता जाता मोठा निर्णय

कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे राम शिंदे यांच्यात या मुद्यावर जोरदार चुरस आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांना हक्काची नोकरी मिळावी, यासाठी येथे एमआयडीसी उभारण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून होत होती. याच अनुषंगाने विधिमंडळाच्या अधिवेशनात अनेकदा त्यांनी हा प्रश्नही उपस्थित केला होता. विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषणही केले होते. त्यावेळी, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.

MIDC
Mumbai Metro-3 : ॲक्वा लाईनवरून प्रवास करणाऱ्यांना मेट्रो देणार सुखद धक्का!

महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात कर्जत तालुक्यातील कोंभळी - खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसूचना १४ ऑक्टोबर २०२४ रोजी उद्योग विभागाने प्रसिद्ध केली आहे. महायुती सरकारच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी मौजे पाटेगाव-खंडाळा येथील ४५८ हेक्टर प्रस्तावित जागा निश्चित करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांपासून गाजत असलेल्या कर्जत एमआयडीसीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी ही गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास आली आहे. कर्जत तालुक्यातील कोंभळी खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार उद्योग विभागाच्या राजपत्रात कोंभळी खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसूचना १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रधान सचिव उद्योग विभाग तथा अध्यक्ष उच्चाधिकार समिती यांच्या अध्यक्षतेखाली १६२ वी बैठक दिनांक ७, मार्च, २०२४ रोजी मंत्रालयता उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न झाली होती. त्यामध्ये विषय क्रमांक ६ नुसार, मौजे कोंभळी, रवळगाव, थेरगाव तालुका कर्जत (जि.अहिल्यानगर) येथे एमआयडीसीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. तसेच, येथील ४८१.९८ हेक्टर { १२०४.५ एकर } क्षेत्र अधिसूचित करणेकामी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ अधिनियम १९६१ अन्वये प्रकरण ६ कलम खंड २ (ग) च्या तरतुदी करण्यात आल्या असून एमआयडीसीला तत्वतः मान्यता देण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com