दोन मंत्र्यांमुळे 'झेडपी'ला बक्कळ निधी; २०० कोटींची कामे सुरु

Kolhapur Jilha Parishad
Kolhapur Jilha ParishadTendernama
Published on

कोल्‍हापूर (Kolhapur) : गेल्या अनेक वर्षानंतर जिल्‍हा परिषदेला (Kolhapur Zilha Parishad) बक्‍कळ निधी प्राप्‍त होत असून, परिणामी एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत जवळपास तब्बल १९०० टेंडर (Tender) काढण्यात आली आहेत. या सर्व टेंडरची एकूण रक्‍कम २०० कोटींवर पोहोचली आहे. या निधीतून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्‍ते, गटर, पाणी पुरवठा, स्‍वच्‍छता आणि आरोग्याची विकास कामे सुरु झाली आहेत. तसेच महिन्याभरानंतर जिल्‍हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून किमान १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे जिल्‍हा परिषदेमार्फत मार्गी लागण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यामुळे जिल्‍हा परिषदेच्या निधीत वाढ होत असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात येत आहे.

Kolhapur Jilha Parishad
'कोळसा धुवा अन् कोट्यवधी कमवा'; १२०० कोटींच्या टेंडरवर प्रश्न?

मागील दोन वर्षांपासून सर्वत्रच कोरोनाचे संकट आहे. विकासकामांचा निधी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा सामना करण्यासाठी वळवण्यात आला. त्यामुळे उपलब्‍ध निधीतून अगदीच नगण्य कामे करण्यात आली. या कामांच्या जोरावर निवडणुकीलाही सामोरे जाणे शक्य नसल्याने सदस्यांकडून सतत निधीची मागणी होत होती. याचाच विचार करुन एप्रिल महिन्यांपासून विविध हेडमधून जिल्‍हा परिषद सदस्य, खासदार, आमदार यांना विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध केला जात आहे. सरकारने सुशिक्षित बेरोजगारची मर्यादा तीन लाखांवरुन १० लाख रुपये केल्याने बहुतांश कामे ही सुशिक्षित बेरोजगार व मजूर सोसायट्यांना दिली जात आहेत.

Kolhapur Jilha Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांसाठी आता नव्या कार, कारण...

जिल्‍हा परिषदेला आमदार, खासदार, २५१५, ३०५४ म्‍हणजेच लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे, दलित वस्‍ती, अ ब व क वर्ग कार्यक्रम, यात्रास्‍थळ विकास, पर्यटन, जनसुविधा व नागरीसुविधा अशा विविध हेडमधून विकासकामांसाठी निधी प्राप्‍त होतो. मात्र दोन वर्षात कोरोनामुळे अनेक हेडला पैसे उपलब्‍ध झाले नव्‍हते. जो निधी उपलब्‍ध झाला त्यातून कामे घेण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ सुरु होती. मात्र एप्रिल महिन्यांपासून जिल्‍हा परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्‍त होत आहे. या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्‍हा परिषदेला तब्‍बल २०० कोटी रुपये प्राप्‍त झाले आहेत. यातून जवळपास १६०० कामे घेण्यात आली.

Kolhapur Jilha Parishad
सातारा-कागल रस्त्याचे टेंडर एवढ्या कोटींचे; पुन्हा महिन्याची मुदत

जिल्‍हा परिषदेला प्राप्‍त निधीतून रस्‍ते, गटर्स, पेव्‍हिंग ब्‍लॉक बरोबरच सांडपाण्यावर प्रक्रिया, नळ पाणी पुरवठा दुरुस्‍ती आणि नवीन कामे, दलित वस्‍तीत सुधारणा करणे, शोषखड्डे, पर्यटनस्‍थळांचा विकास, मंदिर परिसर सुशोभीकरण, शाळांची बांधकामे व दुरुस्‍ती आणि सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे आरोग्य यंत्रणा अधिकाधिक बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली. निधीची तरतूद वाढल्याने लोकप्रतिनिधी, सदस्य आणि कंत्राटदारही समाधानी झाले आहेत.

Kolhapur Jilha Parishad
औरंगाबादमध्ये १२० कोटींचे टेंडर फुगणार; …पैसाही जाणार

जिल्‍हा परिषदेला आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्‍त झाला आहे. पुढील दोन महिन्यातही अशीच परिस्‍थिती राहणार आहे. सदस्यांनी मागणी केलेल्या विकासकामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. सत्ताधारी, विरोधक असा भेदभाव न करता निधी देण्यात येईल. कोरोना काळात झालेला निधीचा दुष्‍काळ दोन महिन्यात दूर केला जाईल.

- रसिका पाटील, अर्थ व शिक्षण समिती सभापती

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com