कऱ्हाड (Karhad) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुणे (Pune) ते बंगळुरू (Bangalore) राष्ट्रीय महामार्गावरील जाहीर केलेल्या सातारा ते कागल टप्प्यातील सहापदीकरण कामाचे टेंडर खुले झाले आहे. त्याची सक्रूटीनी करण्याचे काम सुरू आहे. तीन महिन्यात सहापदीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी कागल ते पेठपर्यंतच्या ६१ किलोमीटरच्या पहिला टप्प्याचा खर्च १४९१.७९ कोटींचा असून, त्याचा भांडवली खर्च २१२७.७४ कोटींचा आहे. पेठ ते कागल पर्यंतच्या सहा पदीकरणाची ६७ किलोमीरटचा दुसरा टप्पा असून, त्याचा १७४९.८६ कोटींचा खर्च तर भांडवली खर्च २३५०.४१ कोटींचा आहे. दोन्ही टप्प्यांचा भांडवली खर्च ४४७९.१५ कोटींचा आहे.
महामार्गाच्या होणाऱ्या सहापदरीकरणात सातारा ते कागल टप्प्यात काँक्रीटकरण व डांबरीकरण संमिश्रपणे होणार आहे. पहिल्या टप्प्याचा वस्तू व सेवा करसहीत खर्च 1670.80 कोटी इतका गृहीत धरण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याची लांबी 61.945 किलोमीटर आहे. दुसऱ्या टप्प्यातचा वस्तू व सेवा करासहीत खर्च 1959.85 कोटींचा अपेक्षित आहे. त्याची लांबी 67 किलोमीटर इतकी आहे. तोही रस्ता काँक्रीटकरण व डांबरीकरण संमिश्रपणे होणार आहे. दोन्ही टप्प्यात तब्बल 90 हजार वाहने चोवीस तासात धावतात, असे गृहीत धरून त्याचा आराखडा तयार केला आहे. हरियाणा येथेली गुरगावच्या मेसर्स एलबीजी कंपनीचा तांत्रिक सल्ला घेतला आहे. त्यानुसार दोन्ही टप्प्यातील सहापदीकरणाचे काम केंद्र सरकारच्या हाती घेतले आहे. त्या अनुशंगाने बांधा, वापरा व हस्तांतरतीर करा, या तत्वार काम होणार आहे. त्याच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. त्याची सुक्रीटीनी सुरू आहे. प्रत्यक्षात काम तीन महिन्यात सुरू होण्याचा अंदाज आहे.
अशी आहेत, प्रकल्पाची वैशिष्ठ्ये
- महामामार्गाची लांबी - १२८ किलीमीटर
- मार्गांवरील मोरींची संख्या - ३२२
- मार्गांवरील सेवा रस्तांची संख्या - १६२ किलोमीटर
- मोठ्या पुलांची संख्या - ११
- लहान पुलांची संख्या - ५३
- सेवा रस्त्यावरील पुलांची संख्या - ५०
- उड्डाण पुलांची संख्या - १७
- मोठ्या भुयारी मार्गांची संख्या - ३९
- लहान भुयारी मार्गांची संख्या - नऊ
- पादचारी भुयारी मार्गांची संख्या - ४२
- रेल्वे ओव्हर ब्रीज - एक
- मार्गांवरील लहान जंक्नश संख्या - ७९
- मार्गांवरील बस थांबा संख्या - ६५
- मार्गांवरील ट्रक थांबा संख्या - चार
- मार्गांवरील टोलनाका संख्या - दोन